Tarun Bharat

‘CTET’ परीक्षा डिसेंबर-जानेवारीमध्ये

पुणे / प्रतिनिधी :

‘CTET’ Exam in December-January केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर आहे. परीक्षेची तारीख उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर नमूद असेल. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, भाषा, पात्रतेचे निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा केंदे, महत्त्वाच्या तारखा आदी तपशील https://ctet.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शुल्क भरलेल्या उमेदवारांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र उपलब्धतेनुसार दिले जाईल.

अधिक वाचा : इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा दणका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र

परीक्षा केंद्र असलेली शहरे, परीक्षार्थी क्षमता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवार अर्ज भरत असताना, शुल्क भरत असताना, शुल्क भरल्याची प्रक्रिया पूर्ण होताना एखाद्या शहरातील क्षमता पूर्ण झाल्यास संबंधित उमेदवाराला अन्य शहरातील परीक्षा केंद्र निवडण्याचा किंवा संबंधित व्यवहार रद्द करण्याचा पर्याय दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन प्रतिज्ञा

Tousif Mujawar

‘नळ गळती थांबवा पाणी वाचवा’ संकल्प

Patil_p

बंडखोर शिंदे गटाला धडा शिकवा

Archana Banage

LPG गॅस सिलिंडर महागला

datta jadhav

धर्मांध भाजपला शाहूनगरी धडा शिकवेल; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Archana Banage

‘वारी विवेकाची’ तीन दिवशीय ऑनलाईन व्याख्यानमाला

Archana Banage
error: Content is protected !!