उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते.या दिवसात पाण्यासोबतच काकडी कलिंगडासारखी,जास्त पाणी असलेली फळे खाण्याचा देखील सल्ला दिला जातो.बाजारातही ही फळे सहज उपलब्ध होतात.पण काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. ते कोणते फायदे आहेत आज आपण जाणून घेऊयात.
काकडीत पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मॅंगनीज यांसारखे काही महत्त्वाचे पोषक घटक असतात. यामुळे शरीरातील चयापचय वाढवण्यास काकडी मदत करते. काकडी नियमित खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते. त्यामुळे कोणत्याही आजारावर सहज मात करता येते.
वजन कमी करण्यासाठी काकडी उत्तम काम करते. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी आपल्या आहारात काकडी नियमित ठेवावी.
काकडीत सिलिकासारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. सिलिका हाडांची रचना मजबूत करते. त्यामुळे हाडे सहज कमकुवत होत नाहीत. काकडी नियमित खाल्ल्याने हाडे लवकर मजबूत होतात.
काकडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीनचा समावेश आहे. हे दोन्ही घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, काकडी त्वचा निरोगी ठेवते.

