Tarun Bharat

Sangli : मक्याच्या शेतात गांजाची लागवड; ९ लाखाचा गांजा जप्त

Advertisements

म्हसवड प्रतिनिधी

मार्डी येथील काळे वस्ती नजीक ऊस, मका पिकाच्या शेतात तब्बल ९ लाख ९ हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी राहुल सिताराम गायकवाड या शेतकऱ्य़ास अटक केली आहे.

दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मार्डी येथे मका या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती. दहिवडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेशांतर करुन गांजाचे ग्राहक बनून त्याची पडताळणी केली. तर त्यांना मक्याच्या शेतात गांजाची लागवड दिसली असता पोलिसांनी त्यावर छापा टाकला. यामध्ये ९ लाख ९ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. एनडीपीएस गुन्ह्या अंतर्गत अमंली पदार्थ विक्री व उत्पादन प्रकरणी गुन्हा दाखल करून राहुल तुकाराम गायकवाड रा.मार्डी (वय २३) यास ताब्यात घेतले. पुढील चौकशी दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे आणि कर्मचारी करत आहेत

Related Stories

कोरोना बाधितांकडे पाहण्याचा दृष्टिकोण समाजाने बदलने आवश्यक – खा. राजू शेट्टी

Archana Banage

Sangli : बनावट विवाह नोंदी आधारे वारसा नोंद; शासनाची फसवणूक

Abhijeet Khandekar

निवडणूक प्रक्रिया प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहचविण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करा

Archana Banage

Sangli; इस्लामपुरात मशाल रॅलीने क्रांतिकारकांना आदरांजली

Abhijeet Khandekar

तासगावातून अपहरण झालेले बाळ सुखरूप

Archana Banage

जतमध्ये मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!