Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन कर्णधार संघात कमिन्सचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर आज शनिवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार कमिन्सचे पुनरागमन झाले आहे.

विंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱया कसोटी सामन्यात कमिन्स दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व स्टिव्ह स्मिथकडे सोपविण्यात आले होते. या दुखापतीतून कमिन्स आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो या पहिल्या कसोटीसाठी पुन्हा संघाचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱया पहिल्या कसोटी सामन्यासाठी स्कॉट बोलँडने संघातील आपले स्थान राखले आहे. तसेच यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेचाही संघात समावेश करण्यात आलेला आहे. हेड आणि ग्रीन हे अनुक्रमे 5 व्या आणि 6 व्या स्थानावर फलंदाजीस येतील. उस्मान ख्वाजा आणि लाबुशेन यांची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. लाबुशेनने विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग 3 शतके झळकविली असून त्यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश होता. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत राहिल. या चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया सध्या 75 गुणांसह आघाडीवर असून दक्षिण आफ्रिका 60 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), बोलँड, कॅरे, ग्रीन, हॅरिस, हॅझलहूड, हेड, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, मॉरिस, लियॉन, स्टिव्ह स्मिथ, स्टार्क आणि वॉर्नर. दक्षिण आफ्रिका संघ -एल्गार (कर्णधार), बवुमा, कोटेझी, डि ब्रुयेन, इर्वी, हार्मेर, जान्सेन, केशव महाराज, क्लासेन, एन्गिडी, नॉर्त्जे, रबाडा, व्हॅन डेर डय़ुसेन, व्हेरेनी, विलयम्स आणि झोंडो

Related Stories

बायर्न म्युनिचकडे जर्मन सुपर चषक

Patil_p

लंकेचा ऑस्ट्रेलियावर पहिला मालिकाविजय

Patil_p

रवींद्र जडेजा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : स्टीव्ह स्मिथ

Patil_p

एमएस धोनीने CSK चे कर्णधार पद सोडले

Rohit Salunke

ऑस्ट्रेलियाच्या हिलीकडून धोनीचा विक्रम मोडीत

Patil_p

किदाम्बी श्रीकांत दुसऱया फेरीत दाखल

Amit Kulkarni