Tarun Bharat

शिव्या देणे, ही कोल्हापूरची वा महाराष्ट्राची संस्कृती नाही

पिंपरी / प्रतिनिधी :

आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. आईवरून शिव्या देणे कोल्हापूरची पद्धत आहे. नरेंद्र मोदी, अमितभाईंना शिव्या देणे सहन करू शकत नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा म्हणतात. मात्र, कोल्हापूरची किंवा महाराष्ट्राची संस्कृती कोणालाच शिव्या देवू नका, असेच सांगते. दोन व्यक्तींनाच काय कोणीच कोणाला शिव्या देवू नये, शिव्या देवून काय नोकरी लागणार आहे का, असा सवाल करत उच्च व तंत्रशिक्षणसारखे खाते मिळाल्याने दादा नाराज असतील, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांचा शनिवारी समाचार घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रश्नांबाबत अजित पवार यांनी शनिवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली व विविध कामांचा आढावा घेतला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अतुल शितोळे आदी उपस्थित होते.

आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. पण मोदी, शाहांना शिव्या देणे सहन करू शकत नाही, या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलताना पवार म्हणाले, काय आता हे विनाशकाले विपरित बुद्धी म्हणायची वेळ आली. कोणालाच शिव्या देवू नका, दोन व्यक्तींनाच काय कोणीच कोणालाही शिव्या देऊ नये. शिव्या देवून बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का, एवढय़ा महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींने अशा प्रकारचे काहीतरी वक्तव्य करणे हे बरोबर नाही, अशी टीका त्यांनी केली.

अधिक वाचा : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासूनच शिंदे-फडणवीस सरकार करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर पवार म्हणाले, 105 जागा निवडून येऊनही भाजपचे सरकार आले नाही. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर भाजपने कोणाला तरी सोबत घेवून सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याकरिता अडीच वर्षे गेली. हे सिद्ध झाले. मोठी शक्ती, ताकद असल्याशिवाय एकनाथ शिंदे हे एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस करुच शकत नाहीत, असे मतही पवार यांनी नोंदविले.

Related Stories

निर्बंधाच्या निर्णयाने जनतेत खदखद

Patil_p

अखेर 4 जणांची गुलामगिरितुन मुक्तता

Patil_p

कर्नाटक : साखर कारखान्यांची केंद्राला कर्जाबाबतचे नियम शिथिल करण्याची विनंती

Abhijeet Khandekar

पुतिन राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची शक्यता

datta jadhav

विजेच्या धक्क्याने सोसायटी चेअरमनचा मृत्यू

Patil_p

सर्व प्रयोगशाळांनी सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी : नवल किशोर राम

Tousif Mujawar