Tarun Bharat

वळिवामुळे भाजीपाला आवक कमी; दरात वाढ

एपीएमसी बाजारात कांदा-बटाटा दर वधारले : ओल्या मिरचीचा भाव टिकून

वार्ताहर /अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा-बटाटय़ाचा दर प्रति क्विंटल तीनशे रुपयांनी वाढला आहे. भाजी मार्केटमध्ये यंदा मिरचीचा भाव टिकून आहे. भाज्यांचे दर वाढले आहेत. काही भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.

वळीव पावसामुळे जवारी, बटाटा व भाजीपाला कुजून नुकसान होत आहे. यामुळे बाजारात आवक कमी येत आहे. तसेच महाराष्ट्रातून देखील कांदय़ाची आवक कमीच येत असल्यामुळे कांदा, बटाटा आणि काही भाज्यांचे दर वाढले आहेत.

सध्या बेळगाव भाजी मार्केटमधून रायचूर हैद्राबाद, विजापूर, बागलकोट, गोवा, कारवार, कोकणपट्टा आदी ठिकाणांहून भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. यामुळे निर्यात मोठय़ा प्रमाणात होत आहे. आवक कमी आणि भाजीपाल्याला मागणी वाढल्याने भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढले आहेत, अशी माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.

इंदोर-आग्रा या ठिकाणी सध्या बटाटा शीतगृहामध्ये ठेवण्यात येत आहे. यामुळे इंदोर, आग्रा बाजार पेठेमध्येच बटाटय़ाचे दर वाढले आहेत. सध्या बेळगाव बाजारात तालुक्यातील जवारी उन्हाळी बटाटा येत आहे. लहान खरेदीदार विक्रीसाठी जवारी बटाटा मोठय़ा प्रमाणात खरेदी करत आहेत. शनिवारी केवळ एकच ट्रक इंदोर बटाटा आणला होता. यामुळे बटाटा भावात तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

भाजीपाला प्रति दहा किलो

 • ढबू मिरची…….. 400 ते 450 रु.
 • इंदोर ढबू मिरची. 380 ते 420 रु.
 • बिन्स………….. 800 ते 900 रु.
 • कारली………… 220 ते 250 रु.
 • राणेबेण्णूर वांगी.. 280 ते 300 रु.
 • बेळगाव वांगी…. 320 ते 350 रु.
 • मालीनी पांढरी काकडी 180 ते 200 रु.
 • दोडकी…………. 220 ते 250 रु.
 • कोबी……………… 60 ते 80 रु.
 • इंग्लिश गाजर….. 240 ते 260 रु.
 • बेळगाव गाजर… 240 ते 260 रु.
 • भेंडी…………… 300 ते 320 रु.
 • बिट……………. 100 ते 120 रु.
 • जवारी काकडी…. 300 ते 350 रु.
 • आले…………… 300 ते 350 रु.
 • मटार …………. 00 ते 1000 रु.
 • हिरवी मिरची…. 400 ते 500 रु.
 • जी-फोर मिरची. 900 ते 1000 रु.
 • बटका मिरची….. 800 ते 900 रु.
 • टोमॅटो प्रति ट्रे….. 500 ते 550 रु.
 • दुधी भोपळा प्रति डझन 280 ते 300 रु.
 • गोल भोपळा प्रति क्विं.1500 ते 1800 रु.

जवारी बटाटा प्रतिक्विंटल भाव

 • गोळी………….. 300 ते 500 रु.
 • मिडीयम……… 800 ते 1500 रु.
 • मोठवड………. 800 ते 2000 रु.
 • गोळा………. 2000 ते 2200 रु.
 • इंदोर बटाटा… 1900 ते 2200 रु.

लाल कांदा भाव प्रतिक्विंटल

 • गोळी………….. 500 ते 800 रु.
 • मिडीयम……. 1000 ते 1600 रु.
 • मोठवड…….. 1100 ते 1200 रु.
 • गोळा………. 1300 ते 1400 रु.
 • पांढरा कांदा …. 500 ते 1400 रु.

भाजीपाला शेकडा भाव

 • मेथी………… 1400 ते 1500 रु.
 • शेपू……………. 600 ते 620 रु.
 • पालक…………. 400 ते 600 रु.
 • कांदापात………. 500 ते 600 रु.
 • घटप्रभा कोथिंबिर 1000 ते 1200 रु.
 • बेळगाव कोथिंबिर 600 ते 800 रु.
 • चायना कोथिंबिर 900 ते 1000 रु.
 • लाल भाजी           400 ते 500 रु.

Related Stories

‘तेलही गेले, तूपही गेले अन् हाती…..

Amit Kulkarni

काकती येथील त्या धरणाची पंचायत राज्य मुख्य सचिवांकडून प्रशंसा

Patil_p

जलवाहिन्या घातलेल्या रस्त्यांची दुरुस्ती

Amit Kulkarni

वडगाव परिसरात ड्रेनेजवाहिन्या तुंबल्या

Amit Kulkarni

बेळगाव स्पोर्ट्स क्लब- विजया अकादमी यांच्यात आज अंतिम लढत

Amit Kulkarni

जेएमएफसी आवारातील झाडाची फांदी कोसळली

Patil_p