Advertisements
मालवण : दांडी येथील मोरेश्वरवाडी समुद्रकिनारी सोमवारी सकाळी एक सिलिंडर स्थानिक मच्छीमारांना सापडून आला. याबाबत मालवण पोलिसांना मच्छीमारांकडून माहिती देण्यात आली. पोलीस प्रत्यक्ष जागेवर जाऊन सिलिंडर ताब्यात घेण्यासाठी निघणार होते. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारीसुद्धा रविवारी सकाळी अशाच प्रकारे बेवारस सिलिंडर आढळून आला होता.