वृत्तसंस्था/ प्राग
डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या प्राग महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेकच्या मेरी बुझकोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविताना रशियाच्या पोटापोव्हाचा पराभव केला.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात झेकच्या आठव्या मानांकित मेरी बुझकोव्हाने पोटापोव्हाचा 6-0, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. मेरी बुझकोव्हाचे डब्ल्यूटीए टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे. चालू वर्षाच्या टेनिस हंगामात बुझकोव्हाने मेक्सिकोत झालेल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. 2015 साली प्राग डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेला प्रारंभ झाला असून आतापर्यंत झेकच्या प्लिस्कोव्हा, सॅफ्रोव्हा, क्विटोव्हा, पेसिकोव्हा आणि आता बुझकोव्हाने या पाच महिला टेनिसपटूंनी पदार्पणात ही स्पर्धा जिंकली आहे.