Tarun Bharat

शेवटच्या कसोटीतून डी. ब्रुयेन बाहेर

वृत्तसंस्था/ सिडनी

यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीत खेळणाऱया फलंदाज डी. बुयेन उपलब्ध होऊ शकणार नाही, असे दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी दक्षिण आफ्रिकेवर घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन आणि मेलबोर्न येथील सामने जिंकले आहेत. तर ही शेवटची कसोटी येत्या बुधवारपासून सिडनीत खेळविली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात आता बुयेनच्या जागी व्हॅनडेर डय़ुसेनची पुन्हा निवड करण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. बुयेनची पत्नी पहिल्या अपत्याला जन्म देणार असल्याने तो शेवटच्या कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे सांगण्यात आले.

Related Stories

बोऊसियाची लिव्हरकुसेनवर मात

Patil_p

जी. साथियानचे आव्हान समाप्त

Patil_p

ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱयावर जाण्याची शक्यता

Patil_p

बाबर आझम, फवाद आलम यांची अर्धशतके

Patil_p

वनडे मानांकनात भारत तिसऱया स्थानी

Patil_p

राफाएल बर्गामास्को भारतात येण्यास सज्ज

Patil_p