Tarun Bharat

डी. के. शिवकुमारांना सीबीआयचा धक्का

Advertisements

कनकपूर, संतेकोडीहळ्ळी, दोड्डाआलहळ्ळी येथील मालमत्तांवर छापे

प्रतिनिधी/ बेंगळूर

काही दिवसांपूर्वीच मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱयांसमोर चौकशीसाठी हजर झालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना सीबीआयने धक्का दिला आहे. रामनगर जिल्हय़ातील कनकपूर, दोड्डआलहळ्ळी, संतेकोडीहळ्ळी येथील शिवकुमारांच्या निवासस्थानांसह विविध मालमत्तांवर छापा टाकून सीबीआयने मालमत्ता आणि त्यासंबंधी कागदपत्रांची तपासणी केली. बेहिशेबी मालमत्ता संपादनाच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

सीबीआय अधिकारयांनी टाकलेल्या धाडीविषयी शिवकुमार यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता सीबीआय अधिकाऱयांनी कनकपूर येथे तहसीलदार विश्वनाथ यांच्यासमवेत जाऊन डी. के. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर छापा टाकून झडती घेतली आहे. येथे तासापेक्षा अधिक वेळ तपासणी करण्यात आली. दोड्डआलहळ्ळी आणि संतेकोडीहळ्ळी येथील कारवाई करण्यात आली आहे. दुपारी 3 पर्यंत अधिकाऱयांनी शिवकुमारांच्या मालमत्तांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली तसेच काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते.

2018 मध्ये बेंगळूरमधील निवासस्थान, बिडदी येथील ईगलटन रिसॉर्ट आणि दिल्लीतील निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून डी. के. शिवकुमार यांना धक्का दिला होता. या प्रकरणात त्यांची अद्याप चौकशी होत आहे. ईडीनेही या प्रकरणी शिवकुमारांची चौकशी चालविली आहे. 2018 च्या मनी लाँड्रिंग प्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इतकेच नव्हे तर या प्रकरणात नव्याने याचिका दाखल करण्याचे स्वातंत्र्य तक्रारदारांना देण्यात आले आहे.

Related Stories

”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी”

Archana Banage

पाच राज्यांच्या निवडणुकीचा आज बिगुल वाजणार

datta jadhav

भाजपच्या प्रचारात व्हिडीओचा घोळ

Patil_p

रोख मदत नाकारल्याने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त

Patil_p

सपचे कब्रिस्तान तर आमचे एक्स्पेस वे

Patil_p

बांगलादेशात पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला

Amit Kulkarni
error: Content is protected !!