Tarun Bharat

डी. के. शिवकुमार यांची उचगावला धावती भेट

उचगाव: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी सायंकाळी उचगावला धावती भेट दिली.

 यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर, एमएलसी चन्नाराज हट्टीवळी, मृणाल हेबाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी उचगाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माझी बुडा अध्यक्ष व एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या घरी त्यांचे स्वागत केले. उचगाव ग्रामपंचायत, युवराज कदम परिवार तसेच सुळगा, बेकिनकेरे, अतिवाड, तुरमुरी ग्रामपंचायतीतर्फे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.

भेटीप्रसंगी सिद्धरामय्या म्हणाले, उचगावला आमची धावती भेट असून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. ग्रामदेवता श्री मळेकरणी देवी मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला तुरमुरी सुळगा ग्रा.पं. अध्यक्षा, आंबेवाडी ग्रा.पं. अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

बससेवा सुरळीत पण प्रवाशांचा अभाव

Patil_p

गृहोद्योग करणाऱया महिलांसाठी प्रदर्शनाचे आयोजन

Amit Kulkarni

किरण ठाकुर यांचे 71 व्या वर्षात पदार्पण

Amit Kulkarni

काडा कार्यालयासमोर गोंधळ सुरूच

Patil_p

कोरोनाचा शिरकाव अन् निर्धास्त नागरिक

Amit Kulkarni

जीएसएस महाविद्यालयाचे फुटबॉल स्पर्धेत यश

Amit Kulkarni