Tarun Bharat

दबंग दिल्ली, हरियाणा स्टीलर्स विजयी

वृत्तसंस्था/ हैदराबाद

नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील येथे झालेल्या विविध सामन्यात दबंग दिल्लीने गुजरात जायंटस्चा तर हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेटस्चा पराभव केला. या स्पर्धेतील दबंग दिल्लीचा हा सलग तिसरा विजय आहे.

दबंग दिल्ली आणि गुजरात जायंटस् यांच्यातील सामन्यात दबंग दिल्लीने गुजरात जायंटस्चा 50-47 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यातील शेवटच्या दोन मिनिटांच्या कालावधीत दबंग दिल्लीच्या खेळाडूंनी महत्त्वाचे गुण मिळविल्याने गुजरात जायंटस्ला हात पत्करावी लागली. दबंग दिल्ली संघातील नवीन आशू यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. सामन्याच्या पहिल्या दोन मिनिटातच सोनूने आपल्या चढाईवर गुजरात जायंटस्चे काही गडी बाद केले. गुजरात संघाचे यावेळी सर्व गडी बाद झाल्याने दिल्ली संघाने पाचव्या मिनिटाला 10-3 अशी आघाडी मिळवली होती. नवीनकुमार आणि आशू मलिक यांचा खेळ दर्जेदार झाला. नवीनच्या आक्रमक चढाईवर गुजरात जायंटस्चे केवळ दोन खेळाडू मैदानावर बाकी राहिले होते. बाराव्या मिनिटाला गुजरातचे सर्व गडी बाद झाले. त्यानंतर गुजरातने दिल्लीचे अधिक गडी बाद करत मध्यंतरावेळी दबंग दिल्लीला 21-21 असे बरोबरीत रोखले. 36 व्या मिनिटाला दिल्लीने गुजरातवर 46-38 अशी आठ गुणांची आघाडी मिळवत अखेर हा सामना 50-47 अशा तीन गुणांच्या फरकाने जिंकला.

या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेटस्चा 33-23 अशा 10 गुणांच्या फरकाने पराभव केला. हरियाणा स्टीलर्स संघातील सर्वोत्तम रायडर मनजितला या सामन्यातील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटूचा बहुमान मिळाला. मनजितने या सामन्यात 10 गुण तर मितू शर्माने 8 गुण घेतले. पाटणा पायरेटस्च्या सचिन आणि रोहित गुलिया यांचा खेळही दर्जेदार झाला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघामध्ये आघाडीसाठी चुरस निर्माण झाली पण मध्यंतरावेळी हे दोनही संघ 12-12 असे बरोबरीत राहिले. मनजितच्या सुपर रेडवर 33 व्या मिनिटाला हरियाणा स्टिलर्सला पुन्हा आघाडीवर नेले. हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेटस्चे सर्व गडी बाद करत 37 व्या मिनिटाला 25-21 अशी चार गुणांची आघाडी मिळवली. पण शेवटी हरियाणा स्टिलर्सने हा सामना 10 गुणांच्या फरकाने आरामात जिंकला.

Related Stories

मराठा आरक्षणप्रश्नी उद्या पुन्हा सुनावणी

Patil_p

संगकाराची 10 तास कसून चौकशी

Patil_p

पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ रद्द

Patil_p

दक्षिण विभागाच्या डावात बाबा इंद्रजितचे शतक

Amit Kulkarni

हालँड गोल्डन बॉय पुरस्कार विजेता

Omkar B

डेन्मार्कचा विद्यमान विजेत्या फ्रान्सला धक्का

Patil_p