Dabholi teacher Prashant Chipkar first in district level innovation competition
महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022 -23 अंतर्गत जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दाभोली नं. 2 चे पदवीधर शिक्षक प्रशांत भालचंद्र चिपकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर राज्यस्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.
नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी ,पालक, शिक्षक यांच्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेणाऱ्या सर्व स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सुजन शिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली जाते .प्रतिवर्षीप्रमाणे सन 2022 23 मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे .या अनुषंगाने जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये दाभोली नं. 2, वेंगुर्ले चे पदवीधर शिक्षक प्रशांत भालचंद्र चिपकर यांचा “आवडीचे डोही आनंद तरंग, कलेचा व्यासंग करी मोबाईल व्यसनाधीनता भंग” हा नवोपक्रम जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे .त्याचबरोबर राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी त्याचा नवोपक्रम पात्र ठरला आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-