वेंगुर्ले (वार्ताहर)-
जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेल्या वसंत उर्फ वैभव प्रसाद दाभोलकर या सिंधुदुर्गातील दाभोली गावाचे सुपुत्र वसंत उर्फ वैभव प्रसाद दाभोलकर याने यु.पी.एस.सी. परीक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वी रँक पटकालत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्ग-दाभोली गावाचे नाव रोशन केल्याबद्दल त्यांचा घरी तात्काळ जात उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे सावंतवाडी विधान सभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब यांचे हस्ते त्योचे वडील प्रसाद दाभोलकर यांचा खास गौरव व अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली हायस्कूल नजीकचे रहिवासी असलेले वशंत उर्फ वैभव प्रसाद दाभोलकर यांनी यु.पी.एस.सी. परीक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वीं रैंक पटकविली त्याबद्दल शिवसेनेतर्फे नेहमी आपल्या माणासाला प्रोत्साहन देण्याचा व त्याचा गौरव करण्याच्या प्रथा आहे. शिवसेनेने हे औचित्य साधून तात्काळ वसंत दाभोलकर यांच्या दामोली येथील घरी जात त्यांचे वडील प्रसाद दाभोलकर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद दाभोली शाळा, त्यानंतर वेगुर्ला हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण व त्यानंतर रत्नागिरीच्या फिनोलेक्समधून इंजिनिअरिंग पदवी मिळविणाऱ्या या ग ग्रामीण भागातील सुपुत्राने दुसऱ्या प्रयत्नात हे प्रचंड यश मिळवले. याबद्दल खास त्यांच्या निवासस्थानी जात हा सत्कार करण्यात आला यावेळी उध्दव ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधान सभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुका शिवसेना प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर प्रमुख अजित राऊळ, विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, हिमांशू परब यासह उध्दव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद दाभोली शाळा, त्यानंतर वेगुर्ला हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण व त्यानंतर रत्नागिरीच्या फिनोलेक्समधून इंजिनिअरिंग पदवी मिळविणाऱ्या या ग्रामीण भागातील सुपुत्राने दुसऱ्या प्रयत्नात हे प्रचंड यश मिळवले. वेंगुर्ले एस. टी. आगारात हेड क्लार्क म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रसाद दाभोलकर या सत्काराने भारावून गेले.