Tarun Bharat

दाद सकाळ गोवा, मोईन बॉईज संघ विजयी

साईराज चषक ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दाद सकाळ गोवा संघाने स्टार इलेव्हन संघाचा, डेपो मास्टरने अक्षित स्पोर्ट्सचा, मोईन बॉईजने राजमुद्रा मंडोळीचा तर दाद सकाळ गोवाने डेपो मास्टरचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. मोहित गोणकर, बरकत शेख, किशोर, दाजी नाईक यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित केलेल्या आजच्या पहिल्या सामन्यात दाद सकाळ गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 86 धावा केल्या. त्यात मोहित गोणकरने नाबाद 35, पुनाजी कलगुटकरने 27 धावा केल्या. स्टारतर्फे साजिदने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्टार संघाने 8 षटकात 5 गडी बाद 32 धावाच केल्या.

दुसऱ्या सामन्यात डेपो मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 101 धावा केल्या. त्यात शिवाजीने 22, निखिल व बरकत यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. अक्षिततर्फे प्रशांतने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अक्षित स्पोर्ट्सने 8 षटकात 7 गडी बाद 83 धावाच केल्या. त्यात प्रशांतने 25 तर अभिषेकने 24 धावा केल्या. डेपोतर्फे बरकत शेखने 3 गडी बाद केले.

तिसऱ्या सामन्यात मोईने बॉईजने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 94 धावा केल्या. त्यात इम्रानने 28 धावा केल्या. मंडोळीतर्फे शेखर पाटीलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना राजमुद्रा मंडोळीने 8 षटकात 8 गडी बाद 71 धावा केल्या. त्यात सुनील पाटीलने 16 धावा केल्या. मोईनतर्फे किशोरने 2 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात दाद सकाळ गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 101 धावा केल्या. त्यात दाजी नाईकने 39 तर सूर्या गोणकरने 22 धावा केल्या. डेपो मास्टर्सतर्फे निखिलने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना डेपो मास्टर्सने 8 षटकात 9 गडी बाद 40 धावाच केल्या. त्यात बबलू नाईकने 14 धावा केल्या. गोवातर्फे गौरेशने 3 तर सूर्या व रोहन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे श्र्रीकांत फगरे, हर्ष जॉन थॉमस, जॉकी मस्कारेन्हास, बाळकृष्ण गोडसे, तुषार तहसीलदार व विठ्ठल गवस, रमेश माल्याप्पगोळ, सारंग राघोचे, प्रशांत नाईक, गजानन फगरे, प्रवीण कुराडे, प्रसाद मोरे, बाळकृष्ण पाटील, परशराम पाटील यांच्या हस्ते मोहित गोणकर व दाजी नाईक, किशोर, बरकत शेख यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गुरुवारचे सामने

साईराज स्पोर्ट्स क्लब, वडगाव विऊद्ध बालाजी स्पोर्ट्स हलगा, दुसरा सामना मोईन बॉईज विऊद्ध एवायएमए, अनगोळ, तिसरा सामना व्हीसीसी विऊद्ध वासुदेव स्पोर्ट्स, चौथा सामना पहिल्या सामन्यातील विजेता विऊद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता.

Related Stories

शिवजयंती सोहळा तब्बल 11 तास

Omkar B

भ्रष्टाचाराविरोधी लढा स्वतःपासूनच!

Amit Kulkarni

बॅरिकेड्स हटविले

Patil_p

साहाय्यक उपनिरीक्षकाचा सौंदत्तीजवळ अपघातात मृत्यू

Patil_p

बहाद्दरवाडीच्या दोन खेळाडूंची मिनी ऑलिम्पिकसाठी निवड

Amit Kulkarni

विधीमंडळ हिवाळी अधिवेशन

Amit Kulkarni