Tarun Bharat

वडिलांना बनवा स्टायलिश; तुमच्या वाॅर्डरुममध्ये ठेवा ‘हे’ कपडे

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कालच फादर्स डे (Father’s Day)साजरा झाला. अनेकांनी आपल्या वडिलांनी वेगवेळे गिफ्ट दिलं असेल. केवळ या दिवसापुरते गिफ्ट मर्यादित न राहता तुम्हाला आपल्या वडिलांना काही हटके गिफ्ट द्यायचं असेल तर…! विचारात पडला ना. अहो खूपच सोप आहे. तुमच्या वडिलांना (Dad) नियमित वापरात येणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही सहज गिफ्ट करु शकता. यामध्ये खास करुन तुम्ही स्टायलिश लुकवाले कपडे गिफ्ट करा आणि तुमच्या लाडक्या वडिलांना बनवा माॅडेल. चला तर जाणून घेऊया कोणते कपडे खरेदी करायची..

ऍथलेटिक पोशाख (Athletic Wear)
जर तुमचे वडील फिटनेसप्रेमी असतील आणि त्यांच्या तब्येतीची चांगली काळजी घेत असतील, तर त्यांना काही चांगले ऍथलेटिक कपडे खरेदी करुन द्या. यासाठी त्यांना खरेदीसाठी घेऊन जा आणि त्यांना जिम वेअरची ओळख करून द्या.

चिकन कुर्ता-पायजामा (Chikan Kurta-Pyjamas)
पांढऱ्या कुर्ता पायजमाची क्लासिक जोडी कोणत्याही पुरुषाला नेहमीच चांगली दिसते. हि कपडे पारंपारिक आहेत. याशिवाय कोणत्याही उत्सवाच्यावेळी तुमच्या वडिलांना ही कपडे उठून दिसतील. यामध्ये वेगवेगळ्या कलरची निवड करु शकता.

पोलो टी-शर्ट (Polo T-shirts)
पांढराशुभ्र पोलो टी-शर्ट खूप सुंदर दिसतो. खाकी पँट किंवा जिन्ससोबत हा शर्ट वेअर केल्यास क्लासिक लुक दिसतो. तुम्ही तुमच्या वडीलांना पोलो-टी-शर्ट घ्या. त्यांना जर पोलो टी-शर्ट घालायची इच्छा नसेल तर तुम्ही साधा टी-शर्ट घालण्यासाठी त्यांना तयार करा.

त्यांचा लुक ऍक्सेसराइज करा (Accessorise)
काही अॅक्सेसरीज तुमच्या वडिलांच्या पोशाखाला अधिक आकर्षक बनवू शकतात. यामध्ये बकेट कॅप किंवा बेसबॉल कॅप निवडू शकता. लटकन नेकलेस देखील स्टाईल वाढवण्यासाठी मदत करतील.

स्नीकर्स (Sneakers)
पांढर्‍या स्नीकर्सने फॅशन जगावर कब्जा केला आहे. निळ्या डेनिमच्या जोडीपासून ते राखाडी स्वेटपॅंटच्या जोडीपर्यंत प्रत्येक पोशाखात स्नीकर्स छान दिसतात. तुमच्या वडिलांच्या जुन्या जीर्ण झालेल्या बुटांना कंटाळला असाल तर त्यांच्यासाठी पांढरे स्नीकर्स घ्या. तुमच्या वडिलांना सुंदर दिसतीलच शिवाय त्यांचा लुक स्टायलिश बनवण्यासाठी मदत होईल.

Related Stories

सेनेच्या बंडखोर आमदारांचा पुढचा मुक्काम गोव्यात

Archana Banage

मित्रानेच केला मित्रात घात; इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरुन वाद, १७ वर्षीय तरुणीने रचला कट

Archana Banage

छत्तीसगड : सुरजपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ कृत्यावर आयएएस असोसिएशनने व्यक्त केली नाराजी

Archana Banage

Kolhapur; राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल!

Abhijeet Khandekar

चीनमधील हुबेई प्रांतात भूकंपाचे दोनदा धक्के

datta jadhav

दिवसा शेती वीज पुरवठाप्रश्नी कार्यकारी अभियंतांच्या टेबलावर सोडले साप

Abhijeet Khandekar