Tarun Bharat

दहन’ वेबसीरिजची घोषणा

डिस्ने प्लस हॉटस्टारवर झळकणार

ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारने ‘दहन-राकन का रहस्य’ या नव्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. या सीरिजचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या वेबसीरिजची मोशन पोस्टर्स सादर करण्यात आली असून यात सर्व मुख्य कलाकारांचे लुक्स दाखविण्यात आले आहेत. दहन या सीरिजमध्ये टिस्का चोप्रा आणि सौरभ शुक्ला हे मुख्य भूमिकेत आहेत.

सोशल मीडियावर सर्व कलाकारांचे फर्स्ट लुक शेअर करण्यात आले आहेत. मोशन पोस्टरमध्ये सर्व कलाकारांच्या चेहऱयांवर गूढ आणि आश्चर्याचे भाव दिसून येत आहेत. दहन राकन का रहस्य ही वेबसीरिज सस्पेन्स-थ्रिलर तसेच इनव्हेस्टिगेटिव्ह धाटणीची असावी असे मानले जात आहे.

टिस्काची ही दुसरी वेबसीरिज ठरणार आहे. यापूर्वी तिने ‘होस्टेजेस सीझन 1 मध्ये काम केले हेत. ही सीरिज देखील डिस्ने प्लस हॉटस्टारवर झळकली होती. रोनित रॉयने टिस्कासोबत सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. टिस्का अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जुग जुग जीयो या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट आता प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

Related Stories

‘जय जय महाराष्ट्र माझा’मध्ये लावण्यांचा उत्सव

Patil_p

राज्य नाटय़ स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर

Anuja Kudatarkar

ब्रीद 2 मध्येही ह्रषिकेश जोशी

Patil_p

दक्षिणेत एंट्री करणार हिना खान

Patil_p

रिमी सेन पुनरागमनासाठी तयार

Patil_p

अजय देवगण यांच्याकडून ‘पॅनोरमा म्युझिक’चा श्रीगणेशा

Patil_p