Tarun Bharat

‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात दहीहंडी साजरी

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम : अनेक थर रचत युवकांनी लुटला आनंद

प्रतिनिधी /बेळगाव

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शहरामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. शहरातील अनेक मंडळे दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम दरवषी करत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती. मात्र यंदा विविध ठिकाणी मोठय़ा उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तरुणांनी अनेक थर रचत दहीहंडी फोडली आणि आनंद घेतला.

कॅम्प येथील मेहतर समाज सुधारणा मंडळाचे महर्षि श्री. वाल्मिकी मंदिराच्यावतीने दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहीहंडी फोडण्यासाठी तरुणांनीही आपला सहभाग दर्शविला. विविध मंडळांनी भाग घेवून हंडी फोडून जल्लोष केला. गवळी गल्ली कॅम्प येथील युवक मंडळानेही दहीहंडी आयोजित केली होती. त्या ठिकाणीही युवकांनी मोठय़ा उत्साहाने दहीहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली.

तेलगु कॉलनी-कॅम्प

तेलगु कॉलनी-कॅम्प येथील जयदुर्गा युवक मंडळानेही दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याठिकाणी स्थानिक मंडळांसह इतर भागातील मंडळांनीही भाग घेवून दहीहंडी फोडली. शहरातील मेणशी गल्ली आणि कामत गल्ली येथेही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. मोठय़ा उत्साहात तरुणांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि जल्लोष करत विविध मंडळांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. याचबरोबर शहरामध्ये इतर ठिकाणीही दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. रात्री उशीरापर्यंत काही ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता.

दहीहंडी असल्यामुळे तरुणांबरोबरच बालचमूंही मोठय़ा उत्साहाने त्या ठिकाणी उपस्थित होते. काही ठिकाणी तरुणींनी आणि बालचमुंनी दहीहंडी फोडण्यासाठी भाग घेतला होता. तर मंडळाचे कार्यकर्ते थर केलेल्या गोविंदावर पाण्याची फवारणी करताना दिसत होते. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.

व्यंकटेश मंदिर कमिटीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी

सार्वजनिक श्री गोकुळाष्टमी श्री व्यंकटेश मंदिर कमिटी चव्हाट गल्लीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात पार पडला. गुरुवार दि. 18 रोजी दुपारी 3 वाजता गोकुळ मूर्तीचे आगमन झाले. 4 वाजता लघुरुद्राभिषेक झाला. रात्री 9 पासून पूजाअर्चा व भजन झाले. मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शंखनाद करून जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर आरती व प्रसाद झाला.

शुक्रवारी सकाळी 9 वाजता भजन, 11 वाजता बालगोपाळ मेळाव्यातर्फे टिपऱया खेळण्यात आल्या. 12 वाजता दहीकाला होऊन दुपारी 1 वाजता महाप्रसाद झाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा अतिशय उत्साहात उत्सव कमिटीने जन्माष्टमीचे आयोजन केले. या जन्माष्टमी उत्सवासाठी अध्यक्ष अरुण धमुणे, उपाध्यक्ष अर्जुन मोहनदास, सचिव लक्ष्मणसिंग धमुणे, खजिनदार चंद्रकांत घगणे, व्यवस्थापक जगदीश व्यंकट धमुणे आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाला भाविकांची लक्षणीय गर्दी झाली होती.

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर  बेळगावचे कमांडंट, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. सर्व सहभागी आपल्या छोटय़ा दहीहंडी घेऊन आले होते. मुले व मोठे सगळेच उत्साहाने सहभागी झाले. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी आपल्या भाषणात भारतीय सेना ही एक उत्कृ÷ सेना आहे. सेना अराजकीय आणि धर्मनिरपेक्ष आहे. हे सण साजरे करण्यातून सगळे एकत्र येतात. कार्यक्रम अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन साजरा करण्यात आला. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांकडून पारितोषिक वितरण करण्यात आले.

इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहात

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे (इस्कॉन)  श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. बलराम जयंतीनिमित्त दि. 13 रोजी सायं. इस्कॉनचे अध्यक्ष पपू. भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन झाले. दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वा. विशेष प्रवचनाने कथा महोत्सवाची सांगता झाली.

श्रीमद् भागवतातील दहाव्या स्कंधातील 51 व 52 व्या अध्यायाचे महत्त्व पपू. भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी कथन केले. जन्माष्टमीनिमित्त श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात विशेष सजावट केली आहे. स्वामींनी प्रवचनाद्वारे कृष्णभक्ती हा भगवंतांना जाणण्याचा एकमेव उपाय आहे, असे सांगितले. वयाच्या साडेदहाव्या वर्षापासून 28 व्या वर्षापर्यंत भगवंत मथुरेत राहिले आणि त्यानंतर तेथून त्यांनी द्वारकेला प्रयाण केले. या कालावधीत झालेल्या श्री कृष्णलीला यांचे वर्णन महाराजांनी अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत केल्यामुळे भक्तगण तृप्त झाले.

दि. 19 रोजी पहाटे 4.30 वाजता मंगलारती, 5.15 ते 7.30 यावेळेत हरिनाम जप, त्यानंतर महाराजांचे विशेष प्रवचन, दिवसभर भजन, कीर्तन कार्यक्रम झाले. संध्याकाळी 5.30 वाजता दीक्षित भक्तांद्वारा अभिषेक, त्यानंतर देणगीदारांचे अभिषेक, नाटय़लीला, महाराजांचे विशेष प्रवचन होऊन रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा उत्साहात पार पडला.

आज व्यासपूजा

 इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचा अविर्भाव दिन हा जन्माष्टमीच्या दुसऱया दिवशी येत असल्याने यावषी दि. 20 रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी दहापासून विविध कार्यक्रम होणार असून प्रभुपादांच्या जीवनावर अनेक भक्त आपले विचार व्यक्त करणार आहेत. त्यानंतर भक्ती रसामृतस्वामी महाराजांचे प्रवचन आणि सर्वांसाठी प्रसादाचे आयोजन केले आहे. शनिवारच्या कार्यक्रमातही भक्तांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनतर्फे केले आहे.

Related Stories

लोकमान्य ग्रंथालयात गप्पाटप्पा कार्यक्रम

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

Patil_p

साईराज ग्रामीण चषक अयोध्या कडोली संघाकडे

Amit Kulkarni

जागृतीचा अभाव, विसर्जन व्यवस्थेचा फज्जा

Amit Kulkarni

डेनेजमिश्रित पाणी मिसळल्याने विहिरांचे पाणी दूषित

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट निवडणूक जुलैमध्ये शक्य

Patil_p