Tarun Bharat

भविष्य

20-04-2022 ते 26-4-2022

आकाशाचा पट आणि ग्रहांचा डाव

 नमस्कार, मागचे दोन लेख हे प्रासंगिक होते. श्रीराम नवमी आणि हनुमान जन्मोत्सव याप्रसंगी ते लिहिले होते. त्या अगोदर आपण राहू-केतू यांच्या राशी बदलाबद्दल चर्चा केली. आपण हेही बघितले की राहू आणि केतू यांच्या राशी बदलाचा सगळय़ा राशींवरती काय परिणाम होतो. पण ही चर्चा एकांगी होती. खरे सांगायचे तर एप्रिल महिन्यात नऊच्या नऊ ग्रह राशीबदल करत आहेत. म्हणजेच ते आपली सध्याची रास सोडून पुढच्या राशीत जात आहेत. याला गोचर असे म्हणतात. ‘गो’ म्हणजे ग्रह, ‘चर’ म्हणजे चालणे. तुमच्या आमच्या आयुष्यातली कुठलीही चांगली किंवा वाईट घटना ही दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे सध्याला आपली दशा आणि अंतर्दशा कुठली चालली आहे ती आणि दुसरी म्हणजे सध्या आकाशात कुठला ग्रह कुठल्या राशीत आणि कुणाच्या नक्षत्रात बसला आहे ते. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपला जन्म हा पृथ्वीवर झाला म्हणून पृथ्वी ही केंद्रस्थानी मानून रवीपासून शनीपर्यंत सात ग्रह आणि राहू आणि केतू हे छेदन बिंदू हे निरंतर भ्रमण करत असतात. म्हणजेच दशा/अंतर्दशा आणि गोचर या दोन्ही गोष्टी मिळून घटना घडवत असतात. आता एप्रिल महिन्यात सगळेच ग्रह राशी बदल करत आहेत. याचा अर्थ काहीतरी मोठे अनिष्ट घडणार आहे असे अजिबात नाही. या खगोलीय घटना घडत असतात आणि घडणार. त्यात घाबरण्यासारखे काहीही नसते. कित्येक वर्षापूर्वी (बहुतेक 1999 साली) एका भोंदूबाबाने सगळे ग्रह एका रेषेत येणार आणि पृथ्वीवर प्रलय होणार अशी कोल्हेकुई केली होती. घडले काहीच नाही पण त्या भोंदूबाबाला गाव सोडून  पळावे लागले. असो. हे सगळे ग्रह काय राशी बदल करत आहेत हे बघूया. रवी 14 तारखेला मिषेत, मंगळ 7 तारखेला कुंभेत, बुध 25 तारखेला वृषभेत, गुरु 13 तारखेला मीनेत, शुक्र 27 तारखेला मीनेत आणि शनि 29 तारखेला कुंभेत गोचर करतील. राहू-केतूनी 12 तारखेला राशीबदल  केले आहेत. रवी, बुध, शुक्र, चंद्र हे जलद गतीचे ग्रह आहेत. यावेळचे राशीफळ हे या सगळय़ा ग्रहांच्या राशी बदलावर अवलंबून आहे हे लक्षात घ्यावे. हे साप्ताहिक राशीफळ नाही. जे उपाय दिलेले आहेत ते सगळय़ा ग्रहांना विचारात घेऊन दिलेले आहेत.

 महा उपाय कित्येकांची तक्रार असते की पैसा टिकत नाही. पैसा आल्यानंतर जातो कुठे हे कळत नाही. त्यासाठी एक तोडगा किंवा व्रत सांगतो. हा उपाय कोणत्याही शुभ मंगळवारी किंवा शुक्रवारी सुरू करावा. अकरा कणकेचे दिवे तयार करावे. त्यात एक वात पांढरी कापसाची आणि दुसरी लाल अशा दोन वाती घालाव्यात. कुठलेही तेल घातले तरी चालेल. हे अकरा दिवे महालक्ष्मी मंदिरात किंवा घरच्या देवासमोर प्रज्वलित करून ‘श्री महालक्ष्मी नमो नमः’ मंत्राचा 27 मिनिटे जप करावा. असे अकरा दिवस करावे. अकराव्या दिवशी कुमारी पूजन करावे. रोकडा अनुभव येईल. विशेष सूचना जप करत असताना पदर पसरून किंवा हात पसरून जप करावा. हात जोडून नमस्कार मुदेत जप करू नये.

सोपी वास्तु टिप- केरसुणी ही कधीही दुसऱयाच्या नजरेला पडेल अशी किंवा उभी ठेवू नये.

मेष

भूमी-वाहनाचा लाभ. द्रव्य लाभ. पद  प्रति÷ा वाढेल. दूरच्या प्रवासावर खर्च होईल. वैवाहिक जोडीदाराला त्रास संभवतो. कायद्याच्या कचाटय़ात अडकण्याची शक्मयता आहे. आपल्याच माणसांचा तिरस्कार सहन करावा लागू शकतो.

उपाय सगळय़ा बाबतीमध्ये गुप्तता पाळा. हनुमान चालीसाचा पाठ निरंतर ठेवा

 वृषभ

तुमच्याकडून दुर्वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. श्रम अधिक आणि फायदा कमी अशी परिस्थिती येऊ शकते. कामात बदल होईल. बढतीची शक्मयता असेल. विषय सुख वाढेल. मित्रांचा आणि मोठय़ा माणसांचा सहवास मिळेल. धनवृद्धी होईल पण नोकरीत त्रास.

उपाय वर्तनाकडे लक्ष ठेवा. देवीची सेवा करा.

 मिथुन

कामाचा दर्जा कमी होऊ शकतो. नोकरीत वरि÷ांचा त्रास होईल. सुंदर स्त्रीची प्राप्ती होऊ शकते. शत्रू मान सन्मानाला ठेच पोहोचवू शकतात. प्रवासात त्रास संभवतो. अशक्तपणा आणि रोग होऊ शकतात. वडिलांकडून विरोध होईल. धार्मिक बाबतीत अडचण येईल.

उपाय शक्मयतो धर्माप्रमाणे वर्तन असू द्या. गणेश उपासना करा.

 कर्क

एखाद्या वादात अडकण्याची शक्मयता आहे. अपघातापासून वाचावे लागेल. प्रेमभंग किंवा मनोभंग संभवतो. शारीरिक व्याधीमध्ये ज्वर किंवा ताप त्रास देईल. अविवाहितांचे विवाह जुळतील. नोकरीमध्ये प्रगती. कीर्ती प्रति÷sची प्राप्ती होईल. तीर्थयात्रा घडेल. शिक्षणात यश. पुण्यसंचय होईल.

उपाय नित्य शिव उपासना करा

 सिंह

 वारसा हक्काची प्राप्ती होईल. क्षुल्लक रोग मोठा होण्याची शक्मयता आहे. अचानक धनप्राप्तीचे योग. अध्यात्मात प्रगती होईल. प्रवासात त्रास होईल. वैवाहिक जीवनात त्रास होईल. पोटाची तक्रार वाढेल. नेत्रविकार संभवतात. भागीदारीमध्ये भांडणे होऊ शकतात.

उपायः मन शांत ठेवावे. गर्व करू नये. शिवउपासना करावी.

 कन्या

शत्रूंचा नाश होईल. रोगापासून मुक्तता मिळेल. आर्थिक लाभ होईल. सोने नाणे खरेदी कराल. तुमच्याबाबतीत अफवा पसरवण्यात येतील. विषारी जनावरांची भीती असेल किंवा अन्नातून विषबाधा होऊ शकेल. विवाहविषयक कामात यश. नवीन भागीदारीची सुरुवात होईल.

उपाय वागणे-बोलणे आरशासारखे स्वच्छ ठेवावे. दुर्गा उपासना करावी.

 तूळ

शत्रुपीडा संभवते. खर्चामध्ये वाढ होईल. कर्ज घ्यावे लागू शकते. आपल्या लोकांबरोबर भांडणे संभवतात. शारीरिक कष्ट संभवतात. नातलगांचा त्रास होईल. आपलीच माणसे वैरी होतील. मन अस्थिर असेल. मनात पापवासना येऊ शकतात. शिक्षणात जास्त कष्ट घ्यावे लागतील.

उपाय ध्यानधारणा करा. हनुमानाची उपासना करा.

 वृश्चिक

पोटाचे विकार संभवतात. हातून कुकर्मे घडू नयेत याकरता प्रयत्न करा. मित्रांकडून फसवणूक होऊ शकते. ग्रह चिंता वाटेल. राहत्या जागेत बदल होऊ शकतो. गुरुची कृपा होईल. मंगल कार्य घडेल. शिक्षणात यश मिळेल. मानसन्मान, गौरव वाढेल. मित्रांची भेट होईल.

उपाय डोके शांत ठेवून निर्णय घ्या. कार्तिकी याची उपासना करा

 धनु

अधिकारात वाढ होईल. प्रमोशनची शक्मयता असेल. चांगली बातमी कळेल. वाहन सौख्य उत्तम असेल. गुप्त शत्रूमध्ये वाढ होईल. प्रवासात धोका संभवतो. महत्त्वाची कामे होतील पण उशीर लागेल. प्रवासात त्रास. बदलीची संभावना. स्पर्धेत यश मिळेल.

उपाय दत्तोपासना करा

 मकर

कौटुंबिक खर्च वाढेल. विरोधकांची संख्या वाढेल. पैशाची हानी संभवते. रक्तदोष येऊ नये याची काळजी घ्यावी. जास्त उदारता दाखवू नये. पैसा वाचवावा. देण्या   घेण्यात नुकसान संभवते. छोटय़ा-मोठय़ा जखमा होऊ शकतात. कुटुंबातील कलह वाढू नये ते पहावे. मानसन्मान प्राप्ती. प्रवासात सुख पण मित्र दुरावतील.

उपाय नित्य संध्याकाळी शनी मंत्राचा जप करावा

 कुंभ

पैशाची आवक वाढेल. कुटुंबात वृद्धी होईल. कामे मनासारखी पूर्ण होतील. कर्जापासून मुक्तता मिळेल. मनमानी करू नये. वाहन चालवताना सावध असावे. विरोधक त्रास देतील. नोकरीत वरि÷ांचा त्रास किंवा रोष संभवतो. एकटेपणा वाटेल. उपाय हनुमान उपासना करावी

 मीन

शत्रू कारस्थाने रचतील. छोटी-मोठी संकटे येऊ शकतात. विषयभोगाकडे मनाचा कल असेल. द्रव्यलाभ वाढेल. छानछौकीकरता पैसा खर्च होईल. भांडणे संभवतात. समाजातला दर्जा वाढेल. परगावी प्रस्थान होऊ शकते.

उपाय शक्य तितकी गुरु सेवा करावी. नित्य दत्त दर्शन घ्यावे

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 13 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरूवर 31-12-2020

Omkar B

आजचे भविष्य शनिवार दि. 11 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 2 नोव्हेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य 02-09-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 सप्टेंबर 2020

Patil_p