कुंभोज वार्ताहर
कुंभोज तालुका हातकणंगले येथे डेंगूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे वृत्त ‘दैनिक तरुण भारत’ने प्रसारित केले होते. यावर ग्रामपंचायत कुंभोज आणि तात्काळ उपायोजना करून संपूर्ण गावात जंतू व डासनाशक पावडर फवारणी सुरू केली आहे. आरोग विभागाच्या वतीने गावात डेंगू संरक्षणसाठी अनेक उपाययोजना करण्याचे काम झाल्याने ग्रहकांमधून समाधान व्यक्त करण्यत येत आहे.
कुंभोज येथे डेंगूची वाढती रुग्णसंख्येचे वृत्त दैनिक तरुण भारतने प्रसारित केले होते. परिणामी या वृत्ताची दखल घेऊन ग्रामपंचायत व आरोग्य विभाग कामाला खडबडून जागे झाले असून ग्रामपंचायत आरोग्य विभाग कामाला लागल्याने ग्रामस्थतून समाधान व्यक्त होत आहे.
आज दिवसभर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर, शाहू नगर, वाडी भाग तसेच गावात अनेक ठिकाणी पावडर फवारणी करून नागरिकांना डेंगू पासून सावध राहण्याच्या सूचना केल्या. पावसामुळे वारणा नदीत दूषित पाणी आले असून नागरिकांनी गाळून व गरम करून प्यावे असे आवाहन ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्याकडून करण्यात आला आहे.