काही ठिकाणी वर्षभरापासून वाहून जातेय पाणी : अधिकाऱयांना कळवून अधिकाऱयांची झोपेची सोंगे
वार्ताहर /माशेल
माशेल, खांडोळा भागात जलवाहिनीला गळती सुरु असून दिवसा हजारो लीटर पाणी वाया जात आहे. एका बाजूला पिण्याच्या पाण्याची टंचाई तर दुसऱया बाजूला पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरु असून संबंधित अधिकाऱयांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
माशेल परिसरात अनेक ठिकाणी जल वाहिन्या फुटून तसेच ठिकठिकाणीच्या नादुरुस्त चेंबरमुळे पाणी रस्त्यावरून व गटारातून वाहून वाया जात आहे. काही ठिकाणी पाणी मातीच्या घराच्या बाजूने वाहत असून ते पाणी तिथे जिरून घराच्या भिंती फुगून पडण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. हा प्रकार गेले कित्येक महिने चालू असून संबंधित खात्याच्या माशेल कार्यालयातील कर्मचाऱयांना काही सुयेर सुतक नसल्याचे लोकांकडून बोलले जात आहे.
अधिकाऱयांचे अक्षम्य दुर्लक्ष
जलवाहिन्या फुटल्या असल्याच्या वारंवार तक्रारी देऊनही संबंधित अधिकारी काहीच पाऊल उचलत नाही. खांडोळा गणेशनगर येथे तब्बल तीन वर्षे नादुरुस्त चेंबरमधून हजारो लिटर पाणी गटारातून वाहून वाया जात आहे. इथे काही लोक गटारातून आपआपली खासगी पाईप टाकून चेंबरकडे गोळा झालेले पाणी कपडे, भांडी व आपल्या बागेतील झाडांना शिंपण्यासाठी त्याचा उपयोग करीत आहे.
वर्षभर वाहून जातेय पाणाr
जवळजवळ एक वर्ष होत आले तुरीवाडा माडापै येथे बाबय तुरी यांच्या घराच्या भिंतीजवळून पाणी जात आहे. दोन महिने झाले माशेल तारीवाडा येथे निळकंठ फडते यांच्या घरा समोरही पाणी वाहून जात आहे.
पंधरा दिवस झाले शांतादुर्गा देवस्थान खांडोळा येथे जलवाहिनीतून रस्त्यावरून पाणी वाहत आहे. माशेल खांडोळा कॉलेज ते परेश सॉ मिल दरम्यान दोन ठिकाणी जलवाहिनीतून पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
पाण्याच्या चेंबरजवळ कुजलेला कुत्रा
खांडोळा गावकरवाडा येथे दोन ठिकाणी तर एक महिना अगोदर बेतकी आरोग्य केंद्राजवळच्या एका चेंबरजवळ कुत्रा कुजून सर्वत्र घाण पसरल्याची किंचितही कल्पना कर्मचाऱयांना नव्हती. तेथील स्थानिकांनी जेव्हा हे प्रकरण पंचायतीकडे पोहचविले तेव्हा येथील सुपरव्हायजरला जाग आली. चार दिवसाने जेसीबीच्या साहाय्याने कुजलेला कुत्रा हटविला. या कारणामुळे बरेच दिवस त्या भागातील लोकांनी पाणी वापरले नाही.
आमदारांनी चौकशी करण्याची मागणी
पाणी खात्याचे कार्यालय बाणस्तारीला असून माशेलात स्थानिक सुपरव्हायजर आहे. पाणी वाया जाण्याचे प्रकार चालूच असून एकंदरीत येथे वाहणाऱया पाण्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल येथील जागृत नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष द्यावे त्याचप्रमाणे संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांनी या संबंधी चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.