तरुण भारत

आंध्र प्रदेश : 19 ऑगस्टपासून सुरू होणार ‘सीईटी’ परीक्षा; ‘या’ कोर्सेसमध्ये मिळणार प्रवेश

ऑनलाईन टीम / हैदराबाद : 


आंध्र प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रदेशात 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत इंजीनियरिंग, कृषी आणि फार्मसी कॉमन एंट्रेंस परीक्षा (CET) आयोजित केल्या जाणार आहेत. 

Advertisements


ही प्रवेश परीक्षा जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी  (जेएनटीयू ) काकीनाडा द्वारे आयोजित केली जाते. बीई , बीटेक, बीएससी, बीएफएससी, बीफार्मा, फार्माडी, बीवीएससी आणि एएच अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी 26 जूनपासून अर्ज करू शकतील. 

  • 24 जूनला जारी होऊ शकते अधिसूचना 


मिळालेल्या माहितीनुसार, एपी ईएएमसीईटी अधिसूचना 24 जून रोजी जारी केली जाईल. विद्यार्थी एपीएससीईईची अधिकृत वेबसाईट sche.ap.gov.in वर अधिसूचना वाचू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार अर्जाची प्रक्रिया 24 जुलैपर्यंत जारी असेल. 

  • … तर होणार 500 रुपये दंड 

26 जुलै ते 5 ऑगस्ट या काळात अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना 500 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. तर 6 ते 10, 11 ते 15 ऑगस्ट आणि 16 ते 18 ऑगस्ट या काळात अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अनुक्रमे 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10 हजार रुपये दंड वसूल केला जाईल. 

  • अन्य सीईटी सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता 


अन्य एपी सीईटी म्हणजे आंध्र प्रदेश स्टेट इंजीनियरिंग कॉमन एंट्रेंस परीक्षा, आंध्र प्रदेश फिजिकल एज्युकेशन कॉमन एंट्रेंस परीक्षा, आंध्र प्रदेश स्टेट पोस्ट ग्रॅज्युएट इंजीनियरिंग कॉमन एंट्रेंस परीक्षा, आंध्र प्रदेश स्टेट एज्युकेशन कॉमन एंट्रेंस परीक्षा आणि आंध्र प्रदेश स्टेट लॉ कॉमन एंट्रेंस परीक्षा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आयोजित होण्याची शक्यता आहे. 

Related Stories

भारतात 44,376 नवे कोरोना रुग्ण; 481 मृत्यू

Rohan_P

पश्चिम बंगालमधील बलात्कार पिडितांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Patil_p

काँग्रेसला टीएमसीचा पुन्हा धक्का

Abhijeet Shinde

उत्तराखंडात 3,012 नवे कोरोनाबाधित; 27 मृत्यू

Rohan_P

फ्रान्समध्ये चर्चबाहेर फादरवर गोळीबार

datta jadhav

ऍडमिरल हरि कुमार नवे नौदलप्रमुख

Patil_p
error: Content is protected !!