तरुण भारत

वारणेसह `ही’ पाच धरणे पन्नास टक्के भरली, विसर्ग सुरु

दुष्काळी भागातील तलाव भरण्याची होत आहे मागणी

प्रतिनिधी / सांगली :

Advertisements

सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा खोऱ्यातील धोम, उरमोडी, तारळी, पाटगाव ही धरणे पन्नास टक्के भरली आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात कोसळधारा सुरु आहेत व सर्वच धरणात पाणी आवक चांगली होते आहे दरम्यान कोयना, वारणेसह, दूधगंगा, राधानगरी, उरमोडी, तूळशी पाटगाव येथून विसर्ग सुरु करणेत आला आहे.

वारणा, कृष्णा या नद्या दूथडी भरुन वाहत असल्या तरी पात्रात आहेत. जोडीला महाराष्ट्र-कर्नाटक उच्यस्तरीय मंत्री चर्चा सफल झाली आहे व संवाद व समन्वय ठेवून नद्यांच्या पाणीपातळीचे व्यवस्थापन केले जाते आहे. पहिल्याच दमदार पावसाने नदीकाठी शेतकरी आनंदला आहे. पेरण्याही बहुतांश पूर्ण झाल्या आहेत दरम्यान दुष्काळी जत आटपाडी, कवठेमहांकाळ सांगोला, भागातील तलाव भरुन ठेवावेत तसेच उमदी, जालीहाळसाठी कर्नाटककडून पाणी घ्यावे अशी मागणी होते आहे.

जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 16.90 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टीएमसी प्रमाणात पुढीलप्रमाणे :

कोयना 37.92 (105.25)
धोम 5.41 (13.50)
कन्हेर 3.33 (10.10)
दूधगंगा 9.8 (25.40)
राधानगरी 2.84 (8.36)
तुळशी 1.81 (3.47)
कासारी 1.02 (2.77)
पाटगांव 1.79 (3.72)
धोम बलकवडी 0.96 (4.08)
उरमोडी 6.42 (9.97)
तारळी 3.15 (5.85)
अलमट्टी 38.42 (123)

विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे

कोयना 2100 क्युसेक्स
कण्हेर 24 क्युसेक्स
वारणा 1605 क्युसेक्स
दुधगंगा 1200 क्युसेक्स
राधानगरी 1300 क्युसेक्स
तुळशी 500 क्युसेक्स
पाटगाव 225 क्युसेक्स
उरमोडी 2274 क्युसेक्स

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे :

कृष्णा पूल कराड 15.9 (45)
आयर्विन पूल सांगली 20.0 (40)
अंकली पूल हरिपूर 25.3 (45.11).

Related Stories

सांगली : ओझर्डेच्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

triratna

इंजिनिअरिंग, फार्मसीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा

pradnya p

बाधित रुग्णाच्या कुटुबांची अवहेलना करत असल्याचा तक्रार अर्ज पोलिसात

Patil_p

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, पुढील 4 दिवस अतिवृष्टीचे; हवामान खात्याचा इशारा

pradnya p

राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली; झाला न्युमोनियाचा संसर्ग

pradnya p

अभिमानास्पद…कृष्णा रुग्णालयाचा कोरोना लस संशोधनात सहभाग

Patil_p
error: Content is protected !!