तरुण भारत

सांगली : मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पंढरपुरला पदोन्नतीवर बदली

प्रतिनिधी / इस्लामपूर :

उरुण-इस्लामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद अनिल माळी यांची पदोन्नतीवर पंढरपूर येथे बदली झाली आहे. माळी यांची मुख्याधिकारी गट ‘ब’ संवर्गातून मुख्याधिकारी गट ‘अ’संवर्गात पदोन्नती करण्यात आली आहे.

Advertisements

शासनाचे अवर सचिव सचिन द. सहस्त्रबुद्धे यांनी या बदलीचे आदेश केले.मुख्याधिकारी माळी यांची इस्लामपुरात अवघे काही महिने सेवा झाली. तत्कालीन कार्यतत्पर मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांची बदली झाल्यानंतर ते इस्लामपूर नगरपालिकेकडे रुजू झाले होते.कोरोना काळात त्यांना शहर विकासासाठी फारसा वेळ देता आला नाही. दरम्यान त्यांची पंढरपूर नगरपालिकेकडे पदोन्नतीवर बदली झाली.आषाढी वारी तोंडावर आहे. कोरोनामुळे यावर्षीही पायी वारी न होण्याची शक्यता आहे. पण त्यांच्यापुढे तिथे स्वच्छता अन्य कामांचे आव्हान रहाणार आहे.इस्लामपूर नगरपालिकेकडे नवे मुख्याधिकारी म्हणून कोण रुजू होणार, याबाबत उत्सुकता आहे.

Related Stories

ईटीएस मशिनमुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येणार : जिल्हाधिकारी

triratna

सोलापूर : पंढरपुरात १७ ते २५ जुलैपर्यंत कडक संचारबंदी : जिल्हाधिकारी

triratna

सांगली : शिकाऊ अनुज्ञप्ती अर्ज प्रलंबित असल्यास अर्जाची छाननी करावी

triratna

आळसंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी

triratna

माढा तालुक्यातील घाटणेत शेतीच्या वादातून खून, तीन आरोपींना ४८ तासात अटक

Shankar_P

सोलापूर : दुप्पट फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेचार लाखाचा गंडा

triratna
error: Content is protected !!