तरुण भारत

विशेष फ्लाईटने अमेरिकेत पोहचले सुपरस्टार रजनीकांत; कारण…

ऑनलाईन टीम / चेन्नई : 


सुपरस्टार रजनीकांत आपल्या आरोग्य तपासणीसाठी अमेरिकेत गेले आहेत. काल (18 जून) रात्री उशिराने एका विशेष फ्लाईटने अमेरिकेत रवाना झाले आहेत. चेन्नई एअरपोर्टवरील रजनीकांत आणि लता यांचे  फोटो देखील समोर आले आहेत. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांची मुलगी पहिल्यापासूनच अमेरिकेत आहेत. साधारण पुढील तीन आठवडे तरी रजनीकांत हे अमेरिकेत राहणार आहेत. तिथे त्यांच्या आरोग्य विषयक विविध तपासण्या केल्या जाणार आहेत.

 
दरम्यान, रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जाण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. केंद्राकडून अमेरिकेत जाण्यासाठी विशेष परवानगी मिळाल्यानंतर ते अमेरिकेत गेले आहेत. मागील काही वर्षापासून रजनीकांत यांची प्रकृतीमध्ये चढ – उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य तपासणीसाठी अमेरिकेत जायचे होते. मात्र, सध्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना विदेशात जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागली. 

Related Stories

अभिनेता पर्ल वी पुरीला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

pradnya p

आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार राधिका आपटे

Patil_p

‘फास्ट अँड फ्यूरियस 9’चा मुहूर्त ठरला

Patil_p

प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचे निधन

pradnya p

आलियाने सुरू केली ‘डार्लिंग्स’ची तयारी

Patil_p

डॉक्टर डॉनच्या सेटवर लकी अलीच्या गाण्यांची मैफिल

Patil_p
error: Content is protected !!