तरुण भारत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

ऑनलाईन टीम / हैदराबाद : 


देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. त्यातच शनिवारी तेलंगणातील के चंद्रशेखर राव सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Advertisements
  • लॉकडाऊन हटवणारे देशातील पहिले राज्य 


आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत तेलंगणातील लॉकडाऊन 20 जून म्हणजेच उद्यापासून पूर्णपणे उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार  तेलंगणामध्ये आता उद्यापासून सर्वकाही सुरु होणार आहे. इतकेच नाही तर तेलंगणामध्ये आता नाईट कर्फ्यू , वीकेंड लॉकडाऊनचे नियम देखील हटविण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णपणे लॉकडाऊन हटवणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

  • तेलंगणातील कोरोनाची सद्यस्थिती 


तेलंगणामध्ये शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार, 1417 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्यचे आकडा 6,10,834 इतका पोहोचला. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे पाहून, तेलंगणा सरकारने लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे

Related Stories

नारायण राणेंच्या भेटीसाठी किरीट सोमय्या दिल्लीत

triratna

जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

… तर मी सुशांतच्या कुटुंबीयांची माफी मागेन : संजय राऊत

pradnya p

भारत बायोटेकची ‘नेसल’ लस येणार

Patil_p

कोटामध्ये अडकलेले 7500 विद्यार्थी घरी परतणार

prashant_c

मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाहीत – देवेंद्र फडणवीस

triratna
error: Content is protected !!