तरुण भारत

सोलापुरात जुगार अड्ड्यावर छापा ४० जणांवर कारवाई

कारवाईत सुमारे ७ लाखांचा ऐवज जप्त

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा

Advertisements

सोलापूर  स्थानिक गुन्हे शाखे मार्फत दि. 18 जून रोजी  सायंकाळी  करमाळ्यातील कर्जत रोडवरील हॉटेल स्वागत पाठीमागे जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल, मोटरसायकली सह सुमारे 6 लाख 89 हजार 330 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात गुन्हा दाखल झालेले संशयित सोलापूरसह नगर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत.

याप्रकरणी पोलिस नाईक परशूराम बलभिम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पोलिस निरीक्षक पाटील यांचे आदेशाने करमाळा पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये अवैध धंदे मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मी, सपोनि नागनाथ खुणे, हावलदार बिरूदेव  पारेकर, श्रीकांत गायकवाड, पोलीस नाईक लालसिंग राठोड, पोलीस कॉन्स्टेबल अजय  वाघमारे, राहूल सुरवसे असे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे प्रतिनिधीनीसह दोन पंचांना बरोबर घेऊन कर्जत रस्त्यावरील  स्वागत ढाब्याचे पाठीमागे असलेले एका इमारत मध्ये गेलो तेथे  काही लोक  गोलाकार बसून  मन्ना नावाचा जुगार खेळत असताना दिसले.

सदर जुगार आडडा  संतोष अंबादास जाधव रा.सुमंत नगर करमाळा हा चालवतो. या सर्व संशयित आरोपीकडून 6 लाख 89 हजार 330 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यात रोख रक्कम एक लाख आठ हजार 430 रूपये तर 32 मोबाईल व 3 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या सर्व 40 जणांना अटक केली आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Related Stories

सोलापूर : पिस्तूलाचा धाक दाखवून दोघा सराफ व्यावसायिकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक

triratna

सोलापूर जिल्ह्यात 102.5 मिलिमीटर पावसाची नोंद

triratna

न्यूझीलंड महिला संघाच्या कर्णधारपदी सोफी डेव्हाईन

Patil_p

सोलापूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत लोकसहभाग घ्या : जिल्हाधिकारी

triratna

उत्तरप्रदेशात दोन साधूंची हत्या

prashant_c

कोल्हापूर : इचलकरंजीत तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा ; रोख रक्कमेसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

triratna
error: Content is protected !!