तरुण भारत

2022 पर्यंत 36 राफेल विमाने ताफ्यात

वायुदल प्रमुखांचे प्रतिपादन – पूर्वीच्या तुलनेत लढय़ासाठी अधिक सामर्थ्यशाली – देशात तयार होणार 5 व्या पिढीचे लढाऊ विमान

वृत्तसंस्था  / हैदराबाद

Advertisements

पूर्व लडाखमध्ये चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर भारत स्वतःच्या सामर्थ्यात सातत्याने वाढ करत आहे. मागील वर्षीही तणावाच्या पार्श्वभूमीवर आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज होते आणि आता पूर्वीच्या तुलनेत आमच्या सामर्थ्यात भर पडली असल्याचे उद्गार वायुदल प्रमुख एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांनी शनिवारी काढले आहेत. 2022 पर्यंत वायुदलात करारानुसार सर्व 36 राफेल लढाऊ विमाने सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

इंटीग्रेटेड थिएटर कमांडवर चर्चा सुरू आहे. सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राफेल आणि एलसीएनंतर आम्ही 2-3 मोठी पावले उचलली असून यात एएमसीए सर्वात मोठे आहे. 5 व्या पिढीचे लढाऊ विमान देशातच निर्माण करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचे काम डीआरडीओ करणार असल्याची माहिती भदौरिया यांनी दिली आहे.

2022 पर्यंत वायुदलात 36 राफेल लढाऊ विमाने सामील केली जातील. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडथळय़ांमुळे यात काहीसा विलंब होण्याची शक्यता असली तरीही अनेक विमाने मुदतीपूर्वीच प्राप्त होत असल्याचे वायुदल प्रमुख म्हणाले.

स्थितीवर करडी नजर

सीमेवरील स्थितीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. आम्ही सर्व आवश्यक पावले उचलत आहोत. पुढील टप्प्यासाठी चर्चाही सुरू आहे. कमांडर पातळीवरील बैठकीच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे. याचबरोबर तणावपूर्ण भागांमध्ये सेन्य मागे घेण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर आला आहे. चर्चा सुरू ठेवण्याचा आणि तणाव कमी करण्याचा पहिला प्रयत्न आहे. यानुसारच आम्ही वाटचाल करणार आहोत असे भदौरिया म्हणाले.

क्षेत्रातील सामर्थ्य कायम

एक वर्षापूर्वी सीमेवर तणाव असताना आम्ही मोठय़ा प्रमाणात सुरक्षा दल तैनात केले होते. एक वर्षानंतर आमचे सामर्थ्य कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या एक वर्षात आम्ही अनेक आवश्यक पावले उचलली असून कामही केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आज आमची क्षमता खूपच अधिक असल्याचे उद्गार भदौरिया यांनी काढले आहेत.

बदलांना सामोरे जातेय वायुदल

हैदराबादमध्ये वायुदल अकॅडमीत संयुक्त पदवीधर परेडला त्यांनी संबोधित केले आहे. वेगाने बदलत असलेली सुरक्षा आव्हाने, शेजार आणि अन्य भागांमधील वाढती भू-राजकीय अनिश्चिता पाहता वायुदल नवनव्या तंत्रज्ञांना वेगाने आत्मसात करत आहे. वायुदल परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यातून जात आहे. आमच्या मोहिमांच्या प्रत्येक पैलूत तंत्रज्ञान आणि लढाऊ शक्तीचा जितक्या वेगाने समावेश आता होत आहे, तितका पूर्वी कधीच झालेला नाही असे वायुदलप्रमुख म्हणाले.

Related Stories

नारदा केस : दोन मंत्र्यांसह टीएमसीच्या चार नेत्यांना अटक; नाराज ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात

Rohan_P

राजस्थानात कडाक्याच्या थंडीची लाट

Patil_p

योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Rohan_P

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मुलाने मागितली हिंदूंची माफी

datta jadhav

बिहारमध्ये दिवसभरात 293 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

महाराष्ट्रातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून; 75% उपस्थिती बंधनकारक नाही : उदय सामंत

Rohan_P
error: Content is protected !!