तरुण भारत

आसाममध्ये दिसली दुर्लभ पांढरी हरिण

काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये वावर

एक दुर्लभ हॉग हरिण अलिकडेच आसामच्या काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये कॅमेऱयात कैद झाली आहे. सोशल मीडियावर या हरिणीचे छायाचित्र व्हायरल झाले  आहे.  हरिण पांढऱया रंगाचीही असू शकते यावर लोकांचा विश्वासच बसत नाही. पहिल्यांदाच पांढऱया रंगाची हरिण बघितल्याचे ट्विटवर लोकांकडून म्हटले जात आहे.

Advertisements

या दुर्लभ हरिणीचे छायाचित्र आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. या ट्विटला आतापर्यंत 1500 हून अधिक लाइक्स आणि सुमारे 150 रीट्विट प्राप्त झाले आहेत. काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये दुर्लभ पांढरी हॉग हरिण दिसून आली आहे. हे छायाचित्र जयंत कुमार सरमा यांनी काढले असल्याचे नंदा यांनी म्हटले आहे.

ही दुर्लभ पांढरी हरिण काही दिवसांपूर्वी पार्कमध्ये पहिल्यांदाच दिसून आली होती. ही हरिण कधीकधी पार्कबाहेर देखील पडते आणि अन्य सर्वसाधारण रंगाच्या हरिणींसोबत फिरत असल्याचे काझिरंगा नॅशनल पार्कचे वनाधिकारी रमेश गोगोई यांनी सांगितले आहे.

हरिणीचा पांढरा रंग पूर्णपणे आनुवंशिक (जेनेटिक) आहे. हा रंग जीनमध्ये बदलांमुळे निर्माण होतो. ही हरिण वेगळय़ा प्रजातीची नाही. काझिरंगामध्ये एकूण 40 हजार हॉग हरिणींपैकी एक किंवा दोन प्रकारच्या दुर्लभ पांढऱया हॉग हरिणी आढळू शकतात अशी माहिती गोगोई यांनी दिली आहे.

Related Stories

दिल्ली : काँग्रेस नेते अशोक कुमार वालिया यांचे कोरोनाने निधन

Rohan_P

मिरजेत रेल्वेखाली पडून ड्रायव्हरची आत्महत्या

Abhijeet Shinde

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार पार

prashant_c

राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

Patil_p

जिल्हय़ात आणखीन दोन एमआयडीसींची उभारणी करा : राजेश क्षीरसागर

Sumit Tambekar

ब्रिटिश एअरवेज करणार 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात

datta jadhav
error: Content is protected !!