तरुण भारत

28 तासांमध्ये उभारली 10 मजली इमारत

एखाद्या इमारतीच्या उभारणीला कित्येक महिने आणि वर्षे लागतात. पण चीनच्या चांग्शामध्ये ब्रॉड ग्रूप नावाच्या कंपनीने 28 तास आणि 45 मिनिटात एक 10 मजली इमारत उभी केली आहे. आता सोशल मीडियावर कंपनीकडून निर्मित 10 मजली अपार्टमेंट बिल्डिंगच टाइम्स-लेप्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या इमारतीच्या उभारणीसाठी कंपनीने ‘प्री-फॅब्रिकेटेड कंस्ट्रक्शन सिस्टीम टेक्नॉलॉजी’चा वापर केला आहे. याच्या अंतर्गत इमारतीची निर्मिती छोटय़ा सेल्फ-कंटेन्ड मॉडय़ूलर युनिट्सला असेंबल करून केली जाते, हे युनिट्स पूर्वीच कारखान्यात तयार केलेले असतात. प्री-फॅब्रिकेटेड (पूर्वनिर्मित)  इमारतींना लवकर जोडण्यासाठीच डिझाइन करण्यात आले आहे.

Advertisements

प्रथम कारखान्यात तयार करण्यात आलेल्या बिल्डिंगच्या हिस्स्यांना त्यांच्या निर्मितीच्या ठिकाणी नेण्यात येते, तेथे क्रमवार पद्धतीने नट-बोल्टने एकत्र जोडल्यावर एक इमारत तयार होते. त्यानंतर वीज आणि पाण्याचे कनेक्शन जोडण्यात येते. हे अत्यंत ऑनसाइट इन्स्टॉलेशन होते, केवळ बोल्ट घट्ट करून पाणी आणि वीजेची जोडणी करायच होती असे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीने यासंबंधीचा व्हिडिओ युटय़ूबवर 17 जून रोजी शेअर केला होता. आतापर्यंत याला 12 हजारांहून अधिक ह्यूज आणि 126 लाइक्स मिळाले ाहेत. या 4 मिनिटे 52 सेकंदांच्या टाइम-लेप्स व्हिडिओत कर्मचारी कारखान्यात निर्मित इमारतीच्या विविध हिस्स्यांना यंत्रांच्या मदतीने जोडून एक 10 मजली अपार्टमेंट उभारत असल्याचे दिसू येते.

Related Stories

बांगलादेशात कट्टरवाद्यांकडून दुर्गा पूजा लक्ष्य, तिघांची हत्या

Amit Kulkarni

दोन कुटुंबांना दुप्पट आनंद

Patil_p

‘आत्मनिर्भर भारत’वर रघुराम राजन असंतुष्ट

Patil_p

हृदयरोगांचा पत्ता लागणार डोळय़ांच्या तपासणीतून

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

चीनसाठी हेरगिरी, ब्रिटनच्या 200 प्राध्यापकांवर संशय

Patil_p
error: Content is protected !!