तरुण भारत

एल्गार, डी कॉक यांची अर्धशतके

वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट

कर्णधार डीन एल्गार आणि डी कॉक यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर दुसऱया क्रिकेट कसोटीत दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडीजविरूद्ध पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर 82 षटकांत 5 बाद 218 धावा जमविल्या. एल्गारने 77 धावा झळकविल्या तर डी कॉक 59 धावांवर खेळत आहे.

Advertisements

2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकून आघाडी मिळविली आहे. या दुसऱया कसोटीत विंडीजने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असणाऱया खेळपट्टीचा विंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी चांगलाच फायदा उठविला. दक्षिण आफ्रिकेची एकवेळ स्थिती 3 बाद 37 अशी केविलवाणी होती. डावातील दुसऱया षटकांत विंडीजच्या गॅब्रियलने दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या मार्करेमला खाते उघडण्यापूर्वी चेसकरवी झेलबाद केले. त्यानंतर सिलेसने पीटरसनला 7 धावांवर हहोल्डरकडे झेल देण्यास भाग पाडले. विंडीजच्या रॉचने व्हॅन डेर डय़ुसेनला 4 धावांवर त्रिफळाचीत केले. कर्णधार एल्गार आणि व्हेरीनी यांनी चौथ्या गडय़ासाठी 87 धावांची भागिदारी केली. गॅब्रियलने व्हेरीनीला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या.

एल्गार आणि डी कॉक यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी 79 धावांची भर घातली. खेळाच्या शेवटच्या सत्रात विंडीजच्या मेयर्सने कर्णधार एल्गारचा त्रिफळा उडविला. त्याने 237 चेंडूत 8 चौकारांसह 77 धावा जमविल्या. दिवसअखेर डि कॉक पाच चौकारांसह 59 तर मुल्डेर 2 धावांवर खेळत आहेत. विंडीजतर्फे गॅब्रियलने दोन तर रॉच, सिलेस आणि मेयर्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक दक्षिण आफ्रिका प. डाव- 82 षटकांत 5 बाद 218 (डि कॉक खेळत आहे 59, एल्गार 77, मार्करेम 0, के. पीटरसन 7, व्हॅन डेर डय़ुसेन 4, व्हेरीनी 27, मुल्डेर खेळत आहे. 2, गॅब्रियल 2-47, मेयर्स, सिलेस, रॉच प्रत्येकी एक बळी).

Related Stories

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

Omkar B

नेटिझन्सना भावले सुर्यकुमारचे औदार्य

Omkar B

संजीव गोएंका, सीव्हीसी कॅपिटल आयपीएलचे नवे प्रँचायझी

Patil_p

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत-रशिया संयुक्त विजेते

Patil_p

सिंगापूरमधील ग्रा प्रि मोटार शर्यत रद्द

Patil_p

भारताच्या ग्रिको रोमन मल्लांना ऑलिंपिक पात्रता स्पर्धा हुकणार

Patil_p
error: Content is protected !!