तरुण भारत

भारतीय ऍथलीट्सच्या सराव तसेच सुरक्षेवर ऑलिंपिक आयोजकांचे लक्ष

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय ऍथलीट्सच्या सरावावर तसेच त्यांच्या निवासाच्या सुरक्षावर स्पर्धा आयोजकांकडून अधिक लक्ष केंद्रीत केले गेले आहे. भारतीय चमूची ऑलिंपिक क्रीडाधाममध्ये संपूर्ण सुरक्षा घेतली जाईल, अशा ग्वाहीचे पत्र भारतीय ऑलिंपिक संघटनेला पाठविण्यात आले आहे.

Advertisements

या स्पर्धेसाठी जपानला प्रयाण करणाऱया भारतीय ऍथलीट्सना तसेच क्रीडाधिकाऱयांना प्रयाणापूर्वी एक आठवडय़ाच्या कालावधीत दररोज कोरोना चाचणी घेण्यात जपान शासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच जपानमध्ये दाखल झाल्यानंतर तीन दिवसांच्या कालावधीत भारतीय चमूतील कोणत्याही व्यक्तीला दुसऱया देशातील व्यक्तीशी संपर्क साधण्यावर निर्बंध घातले जातील, असा खुलासा या पत्रामध्ये करण्यात आला आहे. कोरोना महामारी समस्येमुळे जपानच्या शासनाला ही खबरदारी घ्यावी लागत आहे. भारतासह अन्य 11 देशांच्या ऍथलीट्स, प्रशिक्षक आणि इतर अधिकाऱयांना या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. टोकियोमध्ये आगमन झाल्यानंतर 14 दिवसांच्या कालावधीत विविध स्वरूपातील कोरोना बाधित रूग्णांचा शोध घेणे या कारवाईमुळे अधिक सोपे जाईल,  असे सांगण्यात आले आहे. कोरोना संदर्भातील हे नियम थोडे क्लिस्ट आणि अयोग्य वाटत असले तरी त्याची अंमलबजावणी करणे सर्वांच्या दृष्टीने सावधगिरी राहील, असे टोकियो ऑलिंपिक समितीच्या प्रवक्त्याने सांगितले.

भारतातील कोरोना परिस्थितीमध्ये चांगलीच सुधारणा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये भारतामध्ये काही आठवडय़ापूर्वी प्रत्येक दिवशी किमान तीन लाख कोरोना बाधित रूग्ण आढळत होते पण आता ही संख्या 60 हजारपर्यंत आली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱया विविध देशांचे ऍथलीट्सना विविध गटामध्ये समावेश केला जाणार आहे. गट-1 मधील सहभागी असणाऱया देशांच्या ऍथलीट्सना जपानला प्रयाण करण्यापूर्वी पाच दिवसांच्या कालावधीत दररोज त्यांची सक्तीची कोरोना चाचणी घेतली जाईल. गट-1 मध्ये अफगाण, मालदीव, नेपाळ, पाक आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. जपानला जाणाऱया भारतीय पथकातील सर्व ऍथलीट्सना तसेच प्रशिक्षक आणि क्रीडाधिकाऱयांना कोरोना लसीकरण सक्तीचे करण्यात येणार असून प्रयाणापूर्वी या सर्वांची एक आठवडय़ाच्या कालावधीत दररोज कोरोना चाचणी घेतली जाईल, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.  

Related Stories

सुदैव आपल्या बाजूने असेल ही मुख्य अपेक्षा

tarunbharat

वर्ल्ड ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा आजपासून

Patil_p

‘थाला’चा फुल्ली लोडेड सराव!

Patil_p

जर्मनीचा व्हेरेव्ह अजिंक्य

Patil_p

बीएफआयवर करारभंग केल्याचा आरोप

Patil_p

ऑस्ट्रेलियाविरुद्ध निश्चितपणाने खेळेन

Patil_p
error: Content is protected !!