तरुण भारत

दिल्ली : उद्योग विहारमधील चप्पल फॅक्टरीला लागली आग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीतील उद्योग विहारमधील एका चप्पल फॅक्टरीला आग लागली असल्याची घटना घडली आहे. ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली की आजूबाजूच्या परिसराचे देखील मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisements

 
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 24 गाड्या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातच दिलासा देणारी बाब म्हणजे या घटनेत आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही आहे. 


अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सकाळी 8.30 वाजता आग लागली असल्याची सूचना मिळाली. त्यानंतर तात्काळ  24 गाड्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले असून आमच्या टीम आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही आग नक्की कशामुळे लागली आहे, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. 

Related Stories

किरीट सोमय्या यांचे जल्लोषी स्वागत

Abhijeet Shinde

सक्रिय रुग्णसंख्या 2 लाखांवर

datta jadhav

भाजपकतर्फे 21 जूनला राज्यभरात योग शिबिरांचं आयोजन, तर 25 जूनला आणीबाणी विरोधात काळा दिवस पाळणार

Abhijeet Shinde

कर्नाटकात आतापर्यंत ३६ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू

Abhijeet Shinde

बंगाल निवडणुकीदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त कोरोनाबाधित

datta jadhav

मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममध्ये कोरोनाचा शिरकाव, 29 गतिमंद मुले बाधित

datta jadhav
error: Content is protected !!