तरुण भारत

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे एकावर चाकू हल्ला

प्रतिनिधी / शिरोळ

२० जून रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार व्यक्तींनी चाकूने व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी करत राजू हनुमंता बनपट्टी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हातातील सोन्याच्या अंगठ्या घेऊन गेल्याची घटना 21 जून रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास शिरोळ जयसिंगपूर रोड वरील आगर फाटा येथे घडली. जखमीस जयसिंगपूर येथे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी राजू हनुमंता बनपट्टी पंचेचाळीस रा. शाहुनगर जयसिंगपूर हे मोटरसायकलवरून जेवण करण्यासाठी घरी जात असताना संशयित आरोपी हनुमंता नागाप्पा गाडीवर, संदीप भोसले, सुरज चौगुले सर्व राहणार जयसिंगपूर व अन्य एक अनोळखी व्यक्तीने असे चौघांनी मिळून चाकू दगडाने छातीवर डोक्यावर उजव्या बरकडीवर वार करून गंभीर जखमी केले, व बनपट्टी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेऊन शिवीगाळ करून पळून गेले आहेत.

जमलेल्या नागरिकांनी तातडीने जखमी राजू बनपट्टी यास जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. सदर घटनेचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत माळी गजानन कोष्टी  हे करीत आहेत.

Advertisements

Related Stories

स्त्रियांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी

Patil_p

राज्य मागासवर्ग आयोग रद्द करण्याचे आदेश द्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : किलबिलाटाने शाळा गजबजल्या

Abhijeet Shinde

आठ ऑक्टोबरला पुन्हा महालसीकरण मोहिम

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह संख्या 507 वर

Abhijeet Shinde

गतवर्षीचा अनुभव घेत आठ दिवसांत एसओपी तयार करा :पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!