तरुण भारत

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सुरक्षेत मोठी चूक

8 किमीपर्यंत दुसऱयाच वाहनाला पोलिसांनी केले एस्कॉर्ट

वृत्तसंस्था/ग्वाल्हेर

Advertisements

भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. दिल्लीतून ते रस्तेमार्गाने ग्वाल्हेर येथे पोहोचले आहेत. त्यांच्या सुरक्षेत मुरैना ते ग्वाल्हेर दरम्यान ही चूक झाली आहे. पायलट वाहन मुरैनाच्या पुढे दुसऱयाच वाहनाला एस्कॉर्ट करत राहिले. 8 किलोमीटर पुढे गेल्यावर सुरक्षा देत असलेले वाहन सिंधिया यांचे नसल्याचे पोलीस पथकाला उमगले. पायलट वाहनात बसलेल्या पोलिसांना याची जाणीव झाली तोपर्यंत सिंधिया यांचे वाहन खूपच पुढे निघून गेले होते. या निष्काळजीपणासाठी 14 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

सिंधिया यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा मिळालेली आहे. दिल्लीहून ग्वाल्हेर येथे येत असताना संध्याकाळी मुरैना जिल्हय़ात गैरसमजातून सिंधिया यांच्या वाहनाच्या ऐवजी तेथून जाणाऱया त्याच रंगाच्या अन्य वाहनामागून पायलट वाहन जाऊ लागले होते.

थोडय़ा वेळाने पोलिसांना चुकीच्या वाहनाला फॉलो करत असल्याची जाणीव होताच त्यांचे धाबे दणाणले. सुमारे 8 किलोमीटर अंतरापर्यंत पायलट वाहनाशिवाय राज्यसभा खासदार सिंधिया यांचे वाहन प्रवास करत होते. सिंधिया यांचा ताफा हजीरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोहोचल्यावर सुरक्षेतील निष्काळजीपणा दिसून आला. स्थानिक पोलिसांनी खासदारांना सुरक्षित इच्छितस्थळी पोहोचविले आहे.

Related Stories

महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यांसाठी नवी नियमावली

Patil_p

सावित्रीबाई फुले यांचा काँग्रेसला रामराम

Patil_p

ब्रह्मपुत्रा नदीखालून तयार होणार भुयारीमार्ग

Patil_p

ब्रिटनच्या विमानांवरील बंदी आणखी वाढू शकते : हरदीपसिंह पुरी

datta jadhav

अडवाणी, जोशी, कल्याण सिंगांना दोषमुक्त करा!

Patil_p

मुलांसाठीची लस सप्टेंबरपर्यंत शक्य

Patil_p
error: Content is protected !!