तरुण भारत

कॅटरिनाला आवडला विद्याचा ‘शेरनी’

कॅटरिना कैफने विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. अत्यंत सुंदर चित्रपट आहे, अद्भूत विद्या बालनला पाहणे नेहमीच आनंदाची गोष्ट असते असे कॅटरिनाने म्हटले आहे. तिने स्वतःच्या पोस्टमध्ये चित्रपटाचा दिग्दर्शक अमित मसूरकरला टॅग पेले आहे. कॅटरिनासह अन्या आघाडीच्या कलाकारांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

शेरनी हा चित्रपट 18 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात विद्या बालन एका वनाधिकाऱयाच्या भूमिकेत दिसून येते. मानव आणि प्राण्यांच्या संघर्षाच्या जगात ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न करणारी वनाधिकारी विद्या बालनने उत्तमप्रकारे साकारली आहे. याचबरोबर चित्रपटात विजय राज आणि नीरज काबी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये पार पडले आहे.

Advertisements

Related Stories

पांडू म्हणतोय ‘सूचनांचं पालन करायला इसरु नका’

Abhijeet Shinde

वेबची दुनिया कल्पकतेला पूरक : सचिन दरेकर

Patil_p

‘रावणलीला’मधून प्रतीक गांधीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

Patil_p

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँची हजेरी!

Rohan_P

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ! आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Rohan_P

‘सांगते ऐका’ मध्ये सोनालीबद्दल न ऐकलेल्या गोष्टी

Omkar B
error: Content is protected !!