तरुण भारत

ऑस्ट्रिया प्रथमच बाद फेरीत

बुचारेस्ट / वृत्तसंस्था

ख्रिस्तोफ बॉमगार्टनरने केलेल्या एकमेव गोलाच्या बळावर ऑस्ट्रियाने युक्रेनचा 1-0 असा फडशा पाडत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेतील क गटात ऑस्ट्रिया व नेदरलँडस् यांनी आगेकूच केली असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisements

पहिल्या सत्राअखेर ऑस्ट्रियाने युक्रेनवर 1-0 अशी आघाडी घेतली आणि हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. ऑस्ट्रियातर्फे 21 व्या मिनिटाला ख्रिस्तोफ बॉमगार्टनरने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि हा पहिल्या सत्रातील एकमेव गोल ठरला. डेव्हिड अलाबाच्या उत्तम कॉर्नरवर ख्रिस्तोफने हा गोल नोंदवला. वास्तविक, यानंतर अवघ्या 6 मिनिटातच युक्रेनला बरोबरी साधण्याची नामी संधी होती. मात्र, यार्मोलेंकोला त्यावेळी मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करता आले नव्हते. या सत्रात बॉल पझेशनच्या आघाडीवर दोन्ही संघ जवळपास समसमान स्तरावर राहिले. एकीकडे, युक्रेनने 48 टक्के तर ऑस्ट्रियाने 52 टक्के वर्चस्व राखले. दोन्ही संघातील पास ऍक्युरसी आणि शॉटस् ऑन टार्गेटमध्ये देखील फारसा फरक नव्हता.

पहिल्या सत्राअखेर गोलआघाडी कायम राखल्यानंतर दुसऱया सत्रात ऑस्ट्रियाने अधिक आक्रमक खेळावर भर दिला आणि सातत्याने गोलपोस्टवर आक्रमणे केली. येथे त्यांनी बॉल पझेशनच्या आघाडीवर देखील उत्तम वर्चस्व गाजवले. युक्रेनच्या आघाडीवीरांनी काही चाली रचल्या. पण, त्यात फारसा दम नव्हता. ऑस्ट्रियाने येथे 1-0 ही आघाडी अखेरपर्यंत भक्कम ठेवली आणि आगेकूच केली.

युक्रेन व ऑस्ट्रिया या दोन्ही संघांनी यापूर्वी पहिल्या 2 लढतीत 1 विजय व 1 पराभव अशी समान कामगिरी केल्याने उभयतांच्या येथील लढतीला विशेष महत्त्व होते. स्पर्धेतील या क गटातून नेदरलँडस्ने खेळलेले तीनही सामने जिंकले असल्याने 9 गुणांसह त्यांचे अंतिम 16 संघातील स्थान यापूर्वीच निश्चित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर युक्रेन व ऑस्ट्रिया या दोन्ही संघांसाठी ही लढत निर्णायक ठरणे साहजिक होते. गोल डिफरन्समुळे युक्रेनला हा सामना बरोबरीत राखणे देखील पुरेसे ठरले असते. मात्र, यातही त्यांना यश मिळाले नाही.

Related Stories

भारतीय महिलांचा दुसरा हॉकी सामनाही अनिर्णीत

Patil_p

शशांक मनोहर यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा

Patil_p

जर्मनीचा व्हेरेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम आजपासून

Patil_p

रणजी स्पर्धेच्या ड्रॉ मध्ये मुंबई, कर्नाटक, दिल्ली एकाच गटात

Patil_p

कौन है ये तुषार देशपांडे?

Patil_p
error: Content is protected !!