तरुण भारत

फोंडा तालुक्यात ऑनलाईन योग साधना

योगसत्रांना देश विदेशातून प्रतिसाद : काही ठिकाणी मर्यादित स्वरुपात खुली योगसत्रे

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही फोंडा तालुक्यात जागतिक योगदिन ऑनलाईन माध्यमातून जुळून आला. तपोभूमीच्या सद्गुरु योग गुरुकुलसह  पंतजली योग समिती, बेतोडा योगाश्रम व योग प्रसार करणाऱया अन्य संस्था तसेच तालुक्यातील शिक्षण संस्था व भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही ऑनलाईन योगसत्रांचे  आयोजन केले. गुगल मिट, फेसबुक व इतर ऑनलाईन माध्यमांतून योगदिन साजरा करण्यात आला.

 शिक्षण संस्थामध्येही जुळून आला योग

फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात बेतोडा ओम नित्य दिव्य योगाश्रमच्या सहकार्याने योगसत्र घेण्यात आले. या ऑनलाईन सत्रात विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. अशाच प्रकारचे योगसत्र फर्मागुडी येथील पीईएस शिक्षण संस्थेतर्फे शारीरिक शिक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. उच्च माध्यमिक विद्यालय व फार्मसी महाविद्यालय मिळून शंभरहून अधिक विद्यार्थी या ऑनलाईन सत्रात जोडले गेले होते. तासभर चाललेल्या या सत्रात योगासने, प्राणायम, ध्यान आदी योगाचे विविध प्रकार करुन घेण्यात आले. फार्मसी महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱयांसाठी खुले सत्र घेण्यात आले. बोरी येथील स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या खुल्या योगसत्रात बोरी जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, संस्थेचे पदाधिकारी मिनानाथ उपाध्ये, प्राचार्य डॉ. भट यांनी भाग घेतला. विद्यार्थी व पालकांसाठी वेगळे ऑनलाईन सत्र झाले.

पतंजली योग समितीतर्फे हवन विधी

पतंजली योग समिती, फोंडातर्फे पाटणतळी-बांदोडा येथे गायत्रीमंत्र व मृत्यूंजय महामंत्र पठणासह हवन करण्यात आले. कोराना महामारीचे निर्मुलन व्हावे व सभोवतालचे वातावरण शुद्ध होऊन लोकांना मनःशांती लाभावी हे या हवन विधीचे प्रयोजन असल्याचे पतंजलीचे राज्य प्रभारी मोहन आमशेकर यांनी सांगितले. यावेळी खुले योगसत्रही झाले. त्यात दिनेश नाईक, अरुणा भदौरिया व पतंजलीच्या अन्य पदाधिकाऱयांनी सहभाग दर्शविला.

फोंडा भाजपा मंडळातर्फे खडपाबांध फोंडा येथील विश्व हिंदू परिषद सभागृहात तर मडकई भाजपा मंडळातर्फे दुर्भाट येथील शारदा इंग्लीश हायस्कूलमध्ये योगदिन साजरा करण्यात आला. फोंडय़ातील योगसत्रात मोहन आमशेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यात दक्षीण गोव्याचे माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक विश्वनाथ दळवी, रितेश नाईक, सुनिल देसाई यांच्यासह अन्य भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तपोभूमीवर ‘योगासह राहा, घरीच राहा’

योग व अध्यात्माचा प्रचार व प्रसार करणाऱया कुंडई येथील तपोभूमीच्या सद्गुरु योग गुरुकुलतर्फे पिठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन योग मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी ‘योगासह राहा, घरीच राहा’ ही संकल्पना होती. पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या राज्य भरातील हजारो भक्तगणांनी आपापल्या घरातूनच ऑनलाईनच्या माध्यमातून स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना केली. गोव्यासह, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अनुयायी तसेच दुबई, ओमान, इटली व अमेरिकेतील अनुयायीही या कार्यक्रमात ऑनलाईन जोडले गेले होते. या सत्रातून मार्गदर्शन करताना ब्रह्मेशानंद स्वामीजींनी ‘योगा करा आणि निरोगी राहा, दैनंदिन जीवपद्धतीचा भाग म्हणून योगा आत्मसात करा’ असा संदेश दिला. योग समाजाला जोडण्याचे कार्य करीत असून तो केवळ एका हिंदू धर्मापुरता मर्यादित राहिलेला नसून अन्य विविध धर्मियांनी तो स्वीकारलेला आहे, असेही त्यांनी नमूद केले. इंटरनॅशनल सद्गुरु फाऊंडेशन, स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पूर्व पिठाधीश प. पू. ब्रह्मानंद स्वामीजींनी गोव्यात सुरु केलेल्या योगकार्याची चित्रफित यावेळी प्रकाशित करण्यरात आली.

Related Stories

गोव्यातून दुसरी श्रमिक कोकण रेल्वे उधमपूरसाठी रवाना

Omkar B

वास्कोत दोन कार्यालये फोडून लाखभराची रोख लंपास

Omkar B

सांगे भाजपतर्फे 42 कारसेवकांचा सन्मान

Omkar B

शेटये कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा

Amit Kulkarni

गोवा फॉरवर्ड-काँग्रेस युतीबाबत संदिग्धता

Amit Kulkarni

सोनसडा येथे 2 बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्याचा विचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!