तरुण भारत

जिल्हय़ात सोमवारी 399 जणांनी केली कोरोनावर मात

93 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू : सध्या 2 हजार 658 सक्रिय रुग्ण : 58 हजारहून अधिक होमकेअरमध्ये

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

सोमवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 399 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 93 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली असून रुग्णसंख्या घटत चालल्यामुळे सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 74 हजार 768 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत 71 हजार 368 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 2 हजार 658 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी रामदुर्ग तालुक्मयातील 71 वषीय वृद्धाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 742 वर पोहोचला आहे.

अद्याप 3 हजार 369 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 9 लाख 15 हजार 318 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 32 हजार 969 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 58 हजारहून अधिक जण होमकेअरमध्ये आहेत.

सोमवारी मारिहाळ, सांबरा, भाग्यनगर, आझाद गल्ली, कणबर्गी, रामनगर, शहापूर, शास्त्राrनगर, टिळकवाडी, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी बेळगावसह संपूर्ण जिल्हय़ात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होती. लॉकडाऊन उघडण्यात आले असले तरी गर्दी टाळा, नहून तिसऱया लाटेचा धोका आहे, असा इशाराही तज्ञांनी दिला आहे.

एका दिवसात लाखाहून अधिक जणांना लस

सोमवारपासून बेळगाव शहर व जिल्हय़ात लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली असून एका दिवसात जिल्हय़ातील 1 लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे. बेंगळूर येथील बीबीएमपी लसीकरणात आघाडीवर आहे. त्यानंतरचा क्रमांक बेळगाव जिल्हय़ाचा लागतो. सोमवारी दिवसभरात 1 लाख 1 हजार 528 जणांना लस देण्यात आली आहे. 18 वर्षावरील 41 हजार 681 जणांना पहिल्याच दिवशी लस देण्यात आली आहे. 76 हजार 156 जणांना कोविशिल्ड तर 25 हजार 372 जणांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली आहे.

कोविशिल्ड लसीकरणाचा तपशील

तालुकालसीकरण
अथणी8330
बैलहोंगल9106
बेळगाव15508
चिकोडी6259
गोकाक8883
हुक्केरी7496
खानापूर6064
रायबाग4019
रामदुर्ग4781
सौंदत्ती7710

Related Stories

शहर परिसराला वाऱयासह वळिवाचा दणका

Amit Kulkarni

कोरोनाः कर्नाटकात बुधवारी ७,८८३ नवीन रुग्ण

Abhijeet Shinde

खानापूर तालुक्याला विशेष अनुदान मंजूर करा

Amit Kulkarni

प्रयत्नतर्फे निराधार केंद्राला मदत

Amit Kulkarni

स्मार्टसिटी कामाचा खर्च गेला पाण्यात

Amit Kulkarni

सीमाप्रश्न शिवसेनेचा प्रमुख विषय!

Amit Kulkarni
error: Content is protected !!