तरुण भारत

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

नवी दिल्ली/प्रतिनिधी

एककीकडे राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी भेट घेऊन देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसलेली असतानाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे. सोमवारी दिल्लीमध्ये प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना प्रशांत किशोर यांनी सध्या सत्तेत असणाऱ्या भाजप सरकार विरोधात तिसरी किंवा चौथी आघाडी काही आव्हान निर्माण करु शकेल असं मला वाटत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच सोमवारी (२१ जून २०२१ रोजी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती प्रशांत किशोर यांनी दिलीय.

प्रशांत किशोर यांनी पवारांसोबतच्या बैठकांमध्ये केवळ राजकीय चर्चा होत असतात असे म्हंटले आहे. प्रत्येक राज्यात भाजपच्या विरोधात कसं लढता येईल? कोणत्या गोष्टी उपयोगी पडतील आणि कोणत्या नाही, यावर या बैठकीत चर्चा होते, असं सांगतानाच संभाव्य तिसऱ्या आघाडीचं मॉडेल आतासाठी नाही. त्यांच्या योजनेत त्याचा समावेश नाही, असंही त्यांनी सांगितलं. पवार त्यांच्या प्रदीर्घ अनुभव आणि नेटवर्किंग कौशल्याने ओळखले जातात. तर मी राजकीय स्ट्रक्चर देऊ शकतो, असं ते म्हणाले.

तसेच तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो नव्हतो असंही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट झालीय. यापूर्वी ११ जून रोजी पवार आणि किशोर हे शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेटले होते. त्यावेळी या दोघांची बैठक तीन तास सुरु होती.

Advertisements

Related Stories

संसद टीव्हीवर पहा सभागृहांचे कामकाज

Patil_p

मध्य प्रदेशात आता केवळ ‘या’ दिवशी असणार लॉक डाऊन

Rohan_P

विजयन थॉमस यांचा भाजपमध्ये प्रवेश

Patil_p

भारत-चीन सीमेवर अतिरिक्त सैनिक तुकडय़ा

Patil_p

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री

Patil_p

छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक

Patil_p
error: Content is protected !!