तरुण भारत

पंतप्रधान मोदींचा ब्लॉग होतोय लोकप्रिय

कोरोनामुळे निर्माण झालेल्या नव्या आव्हानांवर भाष्य 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या वेबसाईटवर एक ब्लॉग लिहिला असून तो लोकप्रिय होत आहे. त्यात त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या नव्या आव्हानांवर प्रकाश टाकला असून केंद्र-राज्य संबंधांना नवा उजाळा यामुळे मिळाला असे मतप्रदर्शन त्यांनी केले आहे. कोरोनाच्या आव्हानामुळे आर्थिक सुधारणा कार्यक्रम केंद्र व राज्यांनी सहकार्याने लागू केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

सर्व जग कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असताना भारतातील विविध राज्ये मोठय़ा प्रमाणात वित्तसंस्थांकडून कर्जे मिळवू शकली. ही कर्जाची रक्कम 1.06 लाख कोटी इतकी आहे. याचाच अर्थ असा की अशा संकटग्रस्त परिस्थितीतही राज्यांना कर्जे देण्याइतकी पत देशातील आर्थिक संस्थांकडे आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारे यांनी एकत्रितरित्या पेलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे. सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेत धोरणात्मक सुधारणा घडवणे हे जवळपास अशक्य मानले जात होते. तथापि, केंद्र व राज्य सरकारांच्या परस्पर सांमजस्याने हे शक्य होत आहे. भारताचा संघराज्य संकल्पनेचा पाया भक्कम असल्यामुळेच हे शक्य झाले, अशी महत्वपूर्ण टिप्पणी त्यांनी या ब्लॉगमध्ये केली आहे.

मे 2020 मध्ये घोषणा

मे 2020 मध्ये केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. राज्यांना विशिष्ट परिस्थितीत अधिक प्रमाणात कर्जे उचलण्याची अनुमती दिली. जीएसडीपीच्या 2 टक्के इतके जास्त कर्ज घेण्यासाठी ही अनुमती होती. मात्र यातील 1 टक्का कर्ज काही अटींसह देण्यात आले होते. विशिष्ट प्रकारच्या आर्थिक सुधारणा केल्याशिवाय त्याची उचल करता येणार नव्हती. अनेक राज्यांनी या सुधारणा केल्या आणि कर्जाची उचलही केली. हा केंद्र-राज्य सौहार्दपूर्ण संबंधांचा महत्वाच्या परिणाम होता. आर्थिक सुधारणा केल्यास राज्यांना सवलती देण्याची केंद्राने तयारी दर्शविली होती. अनेक राज्यांनी या सुविधेला लाभ उठवत आर्थिक सुधारणांना चालना दिली. केंद्र सरकारने राज्यांना चार महत्वाच्या अर्थिक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यापैकी ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी) ही सुधारणा किमान 13 राज्यांनी लागू केली. यामुळे विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींच्या खात्यांवर थेट पैसे जमा होऊ लागल्याने भ्रष्टाचाराला वाव उरला नाही. याचा लाभ अर्थव्यवस्थेला आणि गरीबांनाही झाला, याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी आपल्या या ब्लॉगमध्ये केला आहे. याशिवाय इतरही माहिती आहे.

Related Stories

25 कोटींच्या चरससह नेपाळी तस्कर ताब्यात

Patil_p

3 पिढय़ांपासून गावात नाही प्रचाराची अनुमती

Patil_p

दिल्ली : कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 6 लाखांचा टप्पा

Rohan_P

पुढील वर्षाच्या दुसऱया तिमाहीत ‘भारत बायोटेक’ची लस येणार

Patil_p

रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

datta jadhav

बिहारमध्ये 1,609 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!