तरुण भारत

महाराष्ट्रात मागील 24 तासात 8,470 नवे कोविड रुग्ण; 188 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी जास्त प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहेत. मागील 24 तासात 8 हजार 470 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर 9 हजार 043 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

Advertisements
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.09%


दरम्यान, कालच्या दिवशी 188 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.98 % इतके आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 57 लाख 42 हजार 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 95.09 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 1,23, 340 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होमक्वारंटाइन


आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 98 लाख 86 हजार 554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 87 हजार 521 (15.1%)  रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 4 हजार 196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

  • उच्चांकी लसीकरण !


दरम्यान, राज्यात कालपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यातील 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

… अन्यथा मंदिरांची टाळी तोडू : भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

Rohan_P

भारताच्या डिजिटल उपक्रमांची जगभरात चर्चा

Amit Kulkarni

नीरज चोप्रा तापाने फणफणला; कोरोना चाचणी निगेटीव्ह

Rohan_P

कोविड काळात वाढत्या बेरोजगारीने देशातील चोऱ्यांमध्ये वाढ

datta jadhav

मध्यप्रदेश, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी ?

Rohan_P

उत्तराखंडमधील चारधामच्या दर्शन प्रारंभाची तारीख घोषित

Amit Kulkarni
error: Content is protected !!