तरुण भारत

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट कायम

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. राज्यात मंगळवारी ३,७०९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. याच वेळी ८,१११ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात कोरोनामुळे १३९ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण २८.१५ लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २६.६२ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत ३४ १६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी पुन्हा एकदा नवीन संक्रमित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात सध्या १.१८ लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी राज्यात कोरोना सकारात्मकता दर २.८७ टक्के होता. तर केस मृत्यु दर (सीएफआर) ३.७४ टक्के होता.

दरम्यान महत्वाची बाब म्हणजे बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी कमी होत आहे. मंगळवारी बेंगळूर जिल्ह्यात ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली. याच वेळी १,७४५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर २६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

Advertisements

Related Stories

अभिनेत्री मालाश्री यांना पतीवियोग

Amit Kulkarni

कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच

Abhijeet Shinde

सत्तेवर आल्यास प्रत्येकाला 10 किलो मोफत तांदूळ

Amit Kulkarni

तीन वर्षात 12.36 लाख बोगस बीपीएल कार्डे रद्द

Amit Kulkarni

तामिळनाडूतील प्रवाशांसाठी कोरोना नकारात्मक अहवाल बंधनकारक

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये प्राण्यांसाठी वॉर रुम स्थापन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!