तरुण भारत

गुजरात दंगलीवर पुस्तक लिहणाऱ्या राणा अयुब यांना धमक्या, सुप्रिया सुळेंनी घेतली दखल

ऑनलाईन टीम / मुंबई

पत्रकार आणि लेखिका राणा अयुब यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्याचे अयुब यांनी आपल्या ट्विट अकाउंट वरुन सांगितले आहे. तसेच अशा घटकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे. याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी अशा कृत्यांवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस यांनी कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

लेखिका राणा अयुब यांनी गुजरात दंगलीवर आधारित २०१६ साली गुजरात दंगलीवर प्रखर भाष्य करणाऱ्या ”Anatomy of a Cover​-up” नावाच्या पुस्तकामुळे त्या वादाच्या भोवऱ्यार सापडल्या होत्या. या वादाला त्यांना अद्याप सामोरे जावं लागत आहे.

अयुब यांना गेल्या काही दिवसांपासून शिवीगाळ करणारे ,बलात्काराच्या धमक्या देणारे मेसेज केले जात आहेत. या होणाऱ्या त्रासातून आपली सोडवणुक व्हावी या हेतुने असे मेसेजचे स्क्रिनशॉट शेअर करत यावर कोणत्याही राज्याचे पोलीस काही कारवाई करतील का असा प्रश्नही विचारला आहे ? याची दखल घेत खासदार सुळे यांनी अशा प्रकारच्या छळाचा निषेध करत, सध्या नेटिझन्सचा त्रास सहन करावे लागत आहे. सरकारने याविरोधात पावले उचलावीत. तसेच दोषींवर कठो कारवाई व्हावी असे ही म्हटले आहे.

Advertisements

”Anatomy of a Cover​-up”

Related Stories

रुग्णसंख्या 6 लाखांपेक्षा अधिक

tarunbharat

नव्या बाधितांमध्ये किंचित घसरण

Amit Kulkarni

मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

तबलीगमुळे 14 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार

Patil_p

सातारकर म्हणताहेत लॉकडाऊन नकोच

Patil_p

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अज्ञातांनी फेकल्या पेट्रोलच्या बाटल्या

triratna
error: Content is protected !!