तरुण भारत

हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट; 2 ठार, 17 जखमी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्या लाहोरमधील जोहर टाऊन येथील घराबाहेर मोठा स्फोट झाला. या स्फोटात 2 जण ठार झाले. तर लहान मुले आणि महिलांसह 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Advertisements

हा स्फोट एवढा भीषण होता की, जवळच्या अनेक घरांच्या काच फुटल्या. तसेच खिडक्यांच्या भिंतीही पडल्या. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बाजदार यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. 

तपासकार्यात अडथळा नको म्हणून, स्थानिक नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे लाहोरचे सीसीपीओ गुलाम डोगर यांनी सांगितले.

Related Stories

अफगाणिस्तानमधील संकटासाठी पाकिस्तान जबादार

Patil_p

महिलांना अधिकार मिळवून देणाऱया लुजैनला कारावास

Patil_p

मानलं बुवा या मुलीला अस्वलासोबत जाते मासेमारीला

Amit Kulkarni

दफनभूमीत जोडप्याचे प्री-वेडिंग फोटोशूट

Amit Kulkarni

5 महिलांचे असामान्य धैर्य

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींच्या संख्येने गाठला 1.10 लाखांचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!