तरुण भारत

महिला आमदारानेच चालविला जेसीबी

झारखंडच्या हजारीबाग जिल्हय़ातील बडकागाव येथील काँग्रेसच्या महिला आमदार अम्बा प्रसाद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. अम्बा प्रसाद यांनी रस्त्यांच्या कामाची पाहणी करताना जेसीबी चालविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रस्त्याचं काम योग्यप्रकारे होतेय की नाही यासंदर्भातील चौकशी करण्यासाठी आमदार प्रत्यक्षात रस्त्यावर उतरल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे काही जणांनी अम्बा प्रसाद यांनी जेसीबी चालविण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले अशी विचारणा करत आहेत. कमर्शियल व्हेईकल आणि अवजड वाहने चालविण्याचा परवाना नसताना त्यांना जेसीबी कसा चालवू दिला असा प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत.

Advertisements

अम्बा यांनी बडकागाव येथील एका रस्त्यावरी खड्ड भरून काढण्याचे काम करण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून खडी आणि अन्य साहित्य मागविल्याचे सांगण्यात येते. या कामासाठी जेसीबी मागविण्यात आला होता. पाहणीसाठी आलेल्या अम्बा यांनी स्वतः जेसीबी चालवून पाहिला आहे. या पाहणीदरम्यान अम्बा यांनी स्थानिकांना स्वच्छतेबद्दल जागरुक करत हातात फावडं घेऊन स्वतः गटारांमध्ये साचलेला गाळ आणि कचरा काढला आहे.

Related Stories

पेगॅसस प्रकरणी पुन्हा कालावधीवाढ

Patil_p

देशात चोवीस तासात 92,605 पॉझिटिव्ह

Patil_p

अधिकाऱ्याची हत्या करून BSF जवानाची आत्महत्या

datta jadhav

तृणमूल काँग्रेसने ‘शताब्दी’ रोखली

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांशी संवाद साधणार

triratna

बिहारमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 2.42 लाखांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!