तरुण भारत

कोविडनंतरचा मधुमेह

कारणे काय?

  • स्टेरॉईडचा वापरः डेक्सामिथियासोन नावाच्या स्टेरॉईडला कोविडमुळे होणार्या निमोनियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त मानले गेले आहे. अर्थात त्याच्या वापरामुळे रक्तातील साखर वाढण्याची तक्रार अनेकांनी केली आहे. अनेकांना इन्सूलिनचे प्रमाणही वाढवावे लागले आहे.
  • इफ्लेमेशन वाढणेः संसर्गात इंफ्लेमेंशन वाढणे ही सर्वसाधारण बाब आहे. आजारापासून बचाव करण्यासाठी पांढर्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया आहे. इंफ्लेमेशनेही प्रोटिनचा स्राव वाढतो. ही बाब इन्सुलिनची क्षमता कमी करुन साखर वाढवण्यास कारणीभूत ठरते.
  • पॅनक्रियाटिकवर परिणामः ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये सापडलेल्या संसर्गाच्या नवीन स्वरुपात पॅनक्रियाटिकमध्ये असलेल्या बीटा पेशींवर अधिक परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. या पेशींवर इन्सूलिनचे उत्पादन अवलंबून असते. बिटा पेशी नष्ट झाल्याने इन्सूलिनची पातळी घसरत जाते आणि रक्तातील साखर वाढण्याची समस्या वाढते.
  • अवयवांवर परिणामः किंग्ज कॉलेज लंडनच्या मते, संसर्गाच्या प्रसाराच्या कारणांमुळे प्रोटीन पॅनक्रियाटिक हे किडनी आणि लिव्हरमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. अशावेळी संसर्गाचा अवयवांवर परणाम होतो आणि त्याची कार्यप्रणाली बिघडवण्याचे काम करते. ग्लुकोजला ऊर्जेत बदल करण्याची क्षमता ही कमकुवत होते.
  • निद्रानाशची समस्याः हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासात कोरोनातून बरे झालेल्या बहुतांश रुग्णात स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे तणाव, अस्वस्थता, निद्रानाशाच्या तक्रारी वाढल्या. या तीन कारणांमुळे रक्तातील साखर वाढते.
  • हृदयविकाराचा धोकाः रक्तातील साखर अनियंत्रित झाल्यानंतर दृष्टी जाणे, किडनी खराब होणे यासारख्या त्रासाबरोबरच हृदयविकाराचा धोकाही वाढतो. पायदुखी, वजन कमी होणे, सतत बाथरुमला जाणे, जखम चिघळणे, डोळ्यासमोर धुरकटपणा असणे, डोके हलके होणे यासारखी लक्षणे दिसत असली तर त्याकडे लक्ष द्यायला हवे.

– डॉ. मनोज कुंभार

Advertisements

Related Stories

दुधीभोपळ्याचे आरोग्यलाभ

Amit Kulkarni

मधुमेह निदानासाठी तपासण्या

Omkar B

घाम येतोय ?

Omkar B

प्रदुषणानं घटतंय आयुर्मान

Omkar B

उपचार जन्मखुणांवर

Omkar B

स्ट्रेस बॉलेचे आरोग्यलाभ

tarunbharat
error: Content is protected !!