तरुण भारत

परदेश शिष्यवृत्तीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी / सांगली

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली.

बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार 30 जून 2021 पर्यंत मुदत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. सदर परिपुर्ण अर्ज
[email protected] या ईमेलवर पाठवून त्याची हार्डकॉपी विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्यावर सादर करावा.

Advertisements

असे समाज कल्याण आयुक्त यांनी कळविले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.

Related Stories

विटा शहरावर आता ‘ड्रोन कॅमेऱ्याची’ची नजर

Abhijeet Shinde

एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय- राज ठाकरे

Abhijeet Shinde

मालवण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Ganeshprasad Gogate

UP Election : …. तर आप देणार २४ तासांत ३०० युनिट मोफत वीज

Abhijeet Shinde

सरकारशी चर्चा करण्याची आंदोलकांची तयारी

Patil_p

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्तीचा निर्णय रद्द ; अजित पवारांचा आदेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!