तरुण भारत

कोल्हापूर पोलिसांचे नादखुळा ट्विट : ‘या’ तीन गोष्टी वापरा अन् ‘वटपौर्णिमेच्या’ भरवशावर राहू नका!


कोल्हापूर \ ऑनलाईन टीम

आज वटपौर्णिमा आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारा पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचं व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. यानिमित्तच कोल्हापूर पोलिसांनी एक लयभारी ट्वीट करत सर्वांना नादखुळा संदेश दिला आहे. सध्या कोल्हापूर पोलिसांच्या या नादखुळ्या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

कोल्हापूर पोलिसांनी एक टेम्पलेट शेअर करत म्हटले आहे की, कार चालवताना सीट बेल्ट आणि बाईक चालवताना हेल्मेट नेहमी वापरा आणि रस्त्यावर फिरताना मास्क वापरा…वटपौर्णिमेच्या भरवश्यावर राहू नका..! कारण प्रत्येकजण सत्यवान इतका भाग्यवान नसतो…असे म्हणत कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूरकरांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या हटके आवाहनाची सोशल मीडियावर मात्र नादखुळा चर्चा रंगली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता कोल्हापूर पोलिसांनी ट्वीट करत कोल्हापुरकरांना काळजी घेण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कार चालवताना सीट बेल्ट आणि बाईक चालवताना हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी यासाठी कोल्हापूर पोलिसांचे आभार देखील मानले आहेत. सध्याची परस्थितीमध्ये कोल्हापूर पोलिसांचा हा संदेश उपयोगी पडणारा आहे.

नियमांचे पालन करण्याबाबत पोलीस नेहमीच आवाहन करत असतात. मात्र अशाप्रकारे कोणी जर आवाहन केले तर नागरिक त्याचे पालन करणारच असाच काहीसा सुर नेटकऱ्यांच्यात या ट्वीटनंतर पाहिला मिळत आहे.

Advertisements

Related Stories

रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्था सलाईनवर

Abhijeet Shinde

मुंबई ड्रग्ज प्रकरणाचा तपास NIA कडे शक्य

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये 16 ते 30 मे दरम्यान कडक लॉकडाऊन!

Rohan_P

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त पीएम मोदींचे मराठीतून ट्वीट, म्हणाले…

Abhijeet Shinde

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; पाहा तुमच्या शहरातील दर

Rohan_P

डेराप्रमुख राम रहीमला जन्मठेप, 31 लाख दंड

Patil_p
error: Content is protected !!