तरुण भारत

सांगली : जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘डोस’ नंतर मनपा प्रशासन रस्त्यावर

प्रतिनिधी / सांगली :

गेल्या काही दिवसात महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत सर्व उपाययोजना काटेकोरपणे कराव्यात अन्यथा महापालिका क्षेत्रात कडक निर्बंध करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला होता. यानंतर महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आज चक्क आयुक्त नितीन कापडणीस यांनी रस्त्यावर उतरत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. शिवाय अनेक नागरिक, व्यापारी, कामगार यांच्या जाग्यावरच कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisements

महापालिका क्षेत्रात विशेषतः सांगली शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने शहरात गर्दी वाढली आहे. नागरिक, व्यापारी सर्रासपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. महापालिका प्रशासनाने मात्र याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले होते. पण जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी महापालिकेच्या यंत्रणेचे कान टोचले होते. त्यामुळे आज आयुक्त कापडणीस यांनी स्वतः रस्त्यावर उतरत कारवाई सुरू केली आहे. उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी ही या कारवाईत सहभागी झाले आहेत.

Related Stories

सांगली : तासगावात कोरोनाने पुन्हा तिघांचा बळी

triratna

सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात वाढले दहा पेक्षा कमी रूग्ण, कोरोनाचे ९ बळी

triratna

सांगली : बेडग येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २० जणांना चावा

triratna

सांगली : मिरज तालुक्यातील ‘या’ जि.प. शाळांचे होणार मॉडेल स्कुलमध्ये रुपांतर

triratna

सांगली : नागप्रेमींकडून जखमी नागास जीवदान!

triratna

सांगलीत कोरोनाचे तीन बळी, नवे रूग्ण ४८

triratna
error: Content is protected !!